मसगा महाविद्यालयात स्री-पुरुष समानतेवर व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:13 AM2021-02-08T04:13:22+5:302021-02-08T04:13:22+5:30
प्रमुख अतिथी म्हणून ॲड. आर.के. बच्छाव, श्रीमती एम.डी. कांबळे, ए.एम. ताह्मणे, जे.डी. हुशंगाबादे, मलीक आर. शेख, ...
प्रमुख अतिथी म्हणून ॲड. आर.के. बच्छाव, श्रीमती एम.डी. कांबळे, ए.एम. ताह्मणे, जे.डी. हुशंगाबादे, मलीक आर. शेख, किशोर त्रिभुवन, प्राचार्य डॉ. डी.एफ. शिरुडे, उपप्राचार्य दीपक सूर्यवंशी, पर्यवेक्षक रवींद्र मोरे उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून एम.बी. कांबळे व जे.डी. हुशंगाबादे होते. हुशंगाबादे यांनी व्याख्यानात ३७६ कलमांची माहिती दिली. तसेच बलात्कार व ॲसिड हल्ला झालेल्या महिलांसाठी दिल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली. स्रियांना फक्त चूल आणि मूल यापर्यंतच सीमित ठेवले जाते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणाबद्दल केलेले योगदानांचे महत्त्व श्रीमती कांबळे यांनी विशद केले.
न्यायाधीश ए.एस. गांधी यांनी अत्याचार करण्यासाठी फक्त स्री आहे असे आज-कालच्या मानव जातीची धारणा आहे, असे मत मांडून, ३५७ या कलमांची माहिती दिली. प्रास्ताविक प्राचार्य शिरुडे यांनी केले. सूत्रसंचालन विशाखा समितीच्या अध्यक्ष प्रा. योगिता पवार यांनी केले व आभार डॉ. व्ही. टी. रामावत यांनी मानले. महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्ष प्रा. व्ही.टी. साळुंखे, डाॅ.व्ही.टी. रामावत, प्रा. रवींद्र मोरे, प्रा. कामिनी पवार, प्रा. सुषमा कुलकर्णी, प्रा. शहाना सुबूही, भाऊसाहेब पवार व शिक्षक उपस्थित होते.