चांदवड महाविद्यालयात केंद्रीय अर्थसंकल्पावर व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 11:29 PM2022-02-05T23:29:01+5:302022-02-05T23:29:25+5:30
चांदवड : येथील कर्मवीर के. ह. आबड कला, श्रीमान मो. गि. लोढा वाणिज्य व श्रीमान पी. एच. जैन विज्ञान महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्यावतीने केंद्रीय अर्थसंकल्पाचे विश्लेषण नाशिकच्या एच. पी. टी. महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजयकुमार वावळे यांनी केले.
चांदवड : येथील कर्मवीर के. ह. आबड कला, श्रीमान मो. गि. लोढा वाणिज्य व श्रीमान पी. एच. जैन विज्ञान महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्यावतीने केंद्रीय अर्थसंकल्पाचे विश्लेषण नाशिकच्या एच. पी. टी. महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजयकुमार वावळे यांनी केले.
देशातील अर्थसंकल्पीय आर्थिक घटकांचा व्यावहारिक परिणाम, अर्थसंकल्प आणि समाजातील विषमता यांचा परस्पर संबंध, संपत्तीचे असमान असणारे वितरण, संपत्तीचे होत असणारे केंद्रीकरण यांसारख्या सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या विषयाची अर्थसंकल्पीय दृष्टीकोनातून समीक्षा केली. अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुरेश पाटील यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात समाविष्ट असणाऱ्या डिजिटल बँक सेवा, कोविड-१९ च्या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी विशेष वैद्यकीय सुविधांच्या तरतुदी, शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण असणाऱ्या किमान आधारभूत किमती, डिजिटल विद्यापीठ, डिजिटल रुपी , रसायनमुक्त शेती, सोलर एनर्जी तसेच शालेय शिक्षणासाठी शंभर वाहिन्यांची निर्मिती अशा विभिन्न बाबींवर प्रकाश टाकला. प्रास्ताविक प्रा. डॉ. रमेश इंगोले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अलका नागरे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. प्रवीण बाचकर यांनी केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. तुषार चांदवडकर, प्रा. विजया जाधव , प्रा. ए. ए. वकील, प्रा. डॉ. पी. आर. सोहनी, प्रा. सी. के. कुदनर, प्रा. एन. पी. जैन , प्रा. डी. ए. दगडे, प्रा. पी. यु. वेताळ प्रा. संजय कोळी, प्रा. डॉ. पालकर प्रा. किशोर अहिरे, प्रा. देवरे, प्रा. दाभाडे, प्रा. अहिरे, प्रा.बनकर उपस्थित होते .