ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याख्यानमाला

By admin | Published: October 16, 2016 01:14 AM2016-10-16T01:14:23+5:302016-10-16T01:14:55+5:30

ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याख्यानमाला

Lecture series for senior citizens | ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याख्यानमाला

ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याख्यानमाला

Next

येवला : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उपक्रमयेवला : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय या बहि:शाल केंद्र व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ज्येष्ठ नागरिक साहायता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात ज्येष्ठ नागरिकांसाठी संत गाडगेबाबा व्याख्यानमाला संपन्न झाली. या व्याख्यानमालेत डॉ. जी. बी. शहा, शौलजा औटी, डॉ. लीना पांढरे यांची व्याख्याने झाली. दुर्गांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान या विषयावर डॉ. जी. बी. शहा यांनी विचार व्यक्त केले. येवला परिसरातील किल्ल्यांसह एकूणच महाराष्ट्रातील व भारतातील किल्ल्यांचा इतिहास विशद केला. खान्देशातील किल्ले, थाळनेर, मालेगाव, अमळनेर येथील किल्लेदारांनी इंग्रजांशी दिलेला लढा शहा यांनी सचित्र कथनशौलीत श्रोत्यांसमोर उभा केला. इतिहासाचे कंगोरे त्यांनी उघड करून दाखिवले. अध्यक्षस्थानी श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष राबसाहेब दाभाडे गुरूजी होते. यावेळी डॉ. भाऊसाहेब गमे, धनराज धनगर उपस्थित होते.
दुसरे पुष्प शौलजा औटी यांनी संत एकनाथ- चरित्र, अभंग, गौळणी, भारुडे या विषयावर गुंफले. संत एकनाथांचा जन्म, बालपण, वंशपरंपरा, सामाजिक शिकवण यावर त्यांनी प्रकाश टाकला. यावेळी स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे सहसचिव एन. बी. बाणी अध्यक्षस्थानी होते. रावसाहेब दाभाडे गुरुजींसह संघाचे सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन केंद्राचे कार्यवाह धनराज धनगर यांनी केले. कविता आव्हाड या विद्यार्थिनीने आभार मानले.
तिसरे पुष्प डॉ. लीना पांढरे यांनी ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालेसे कळस या विषयावर गुंफले. संत बहिणाबार्इंच्या वारकरी संप्रदायरूपी मंदिराचे वर्णन केले. संत नामदेव हे ज्ञानेश्वरांचे समकालीन पण वयाने ज्येष्ठ होते. त्यांचा ज्येष्ठतेचा अहंकार नव्हता. स्वत:ला ज्ञानेश्वरांचे दास म्हणून घेण्यात त्यांना कधीही कमीपणा वाटला नाही याविषयी माहिती दिली. संत सावता माळी, चोखामेळा, नरहरी सोनार, सेना न्हावी यांच्या काव्यांचा व अभंगांचाही परामर्श लोंढे यांनी घेतला. सुवर्णा गुडगे अध्यक्षस्थानी होत्या. (वार्ताहर)
 

Web Title: Lecture series for senior citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.