एलव्हीएच विद्यालयात शिंदे यांचे व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:13 AM2021-02-08T04:13:42+5:302021-02-08T04:13:42+5:30
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दिनेश पवार होते. त्यांनी प्रतिमापूजन केले. परिचय पर्यवेक्षक एम. पी. शिंदे यांनी करून ...
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दिनेश पवार होते. त्यांनी प्रतिमापूजन केले. परिचय पर्यवेक्षक एम. पी. शिंदे यांनी करून दिला. रमेश शिंदे यांचा सत्कार मुख्याध्यापक दिनेश पवार यांनी केला. शिंदे म्हणाले, स्त्रियांनी चूल आणि मूल यात अडकून न राहता आधुनिक युगात आपले योगदान द्यावे ज्या समाजात, देशात स्त्रिया शिकल्या तो देश व समाज प्रगतीपथावर गेल्याशिवाय राहत नाही. स्त्री शिकली तर कुटुंबाचा समाजाचा व देशाचा उद्धार होत असतो. मुख्याध्यापक दिनेश पवार यांचेही भाषण झाले. याप्रसंगी पर्यवेक्षक एम. पी. शिंदे, महिला तक्रार निवारण व विशाखा समिती प्रमुख एस. बी. खैरनार, बी. एम. अहिरे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.सूत्रसंचालन के.आर सूर्यवंशी यांनी केले. तर आभार श्रीमती अहिरे यांनी मानले.