सेंद्रिय व विषमुक्त शेती याविषयी व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 05:39 PM2018-12-06T17:39:53+5:302018-12-06T17:40:37+5:30
सिन्नर: - कर्करोगासारखे आजार अन्नधान्य, भाजीपाला यामध्ये मोठया प्रमाणात रासायनिक कीटकनाशक वापरामुळे होतात. कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे,
सिन्नर: - कर्करोगासारखे आजार अन्नधान्य, भाजीपाला यामध्ये मोठया प्रमाणात रासायनिक कीटकनाशक वापरामुळे होतात. कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे, या आजारावर मात करायची असेल व आरोग्य टिकवायचे असेल तर यावर सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय आहे असे प्रतिपादन राज्याचे सेंद्रिय शेती सल्लागार डॉ. प्रशांत नाईकवाडी यांनी केले.
सिन्नर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित शरद पवार यांच्या वाढदिवसाच्यानिमित्त स्वाभिमान सप्ताहात तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे ते बोलत होते. वडगावपिंगळ्याचे सरपंच चिंतामण मुठाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर किसान सभा तालुकाध्यक्ष वामन पवार, संदीप गायकर, युवक तालुकाध्यक्ष जयराम शिंदे, ओम देशमुख, नथुजी मुठाळ, डी. जी. मुठाळ, गेनुशेठ सानप, दगु घुगे, बाबुराव सांगळे आदी उपस्थित होते.