व्याख्यान, मेळावा : कृषी साहित्य, गृहोपयोगी वस्तूंच्या स्टॉलवर गर्दी कृषी महोत्सवास नाशिककरांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 01:07 AM2018-04-27T01:07:08+5:302018-04-27T01:07:08+5:30

नाशिक : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या वतीने डोंगरे वसतिगृह मैदानावर सुरू झालेल्या जागतिक कृषी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीही नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.

Lectures, Meetings: Feedback on Nashik Krushi Mahotsav for Agriculture Literature, Stove of Homework | व्याख्यान, मेळावा : कृषी साहित्य, गृहोपयोगी वस्तूंच्या स्टॉलवर गर्दी कृषी महोत्सवास नाशिककरांचा प्रतिसाद

व्याख्यान, मेळावा : कृषी साहित्य, गृहोपयोगी वस्तूंच्या स्टॉलवर गर्दी कृषी महोत्सवास नाशिककरांचा प्रतिसाद

Next
ठळक मुद्दे गृहोपयोगी वस्तूंना मागणी असल्याचे दिसून आलेऔषध, गोळ्या यांनाही मोठ्या प्रमाणावर मागणी

नाशिक : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या वतीने डोंगरे वसतिगृह मैदानावर सुरू झालेल्या जागतिक कृषी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीही नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. प्रदर्शनस्थळी थाटलेल्या कृषी साहित्य, गृहोपयोगी वस्तूंना मागणी असल्याचे दिसून आले.
आबासाहेब मोरे, विभागीय धर्मादाय आयुक्त प्रदीप घुले, राजेश खिंवसरा, भास्कर बेहरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमास प्रारंभ झाला. इलेक्ट्रिक रिक्षा, बाइक आदी वाहाने, अ‍ॅग्री ड्रोन कॅमेरा, ३०० पेक्षा जास्त दुर्मिळ वनस्पती, सोलर उत्पादने, शिंपी, सोनार, लोहार यांच्याकडे मिळणारी अवजारे, वस्तू लक्ष वेधत आहे. कृषी पर्यटन, जोड व्यवसाय, शासनाच्या शेतकºयांसाठी योजना, बारा बलुतेदार, कृषी क्षेत्रातील पारंपरिक अवजारे यांचे दर्शन घडवणारे गावाचे जिवंत मॉडेल, दुर्गसंवर्धनासाठी प्रबोधनपर देखावा, पारंपरिक खेळ, क्रीडा व कौशल्य मांडणी (१४ विद्या, ६४ कला आदी), कुस्ती आखाडा, बैठे खेळ, मोय, बैलगाडी, नांगर, औत, ट्रॅक्टर, गावचा बाजार, जत्रा, मंदिरे, पारंपरिक सण, उत्सव, आदर्श गोशाळा, पशुपालन, आदर्श विवाह सोहळा आदींचे देखावे साकारण्यात आले आहे. याशिवाय कृषी संस्कृती दर्शन, पशुधन व गोवंश प्रदर्शन, देशी बी-बियाणे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. दुर्मिळ व औषधी वनस्पती, त्यांचे काढे, औषध, गोळ्या यांनाही मोठ्या प्रमाणावर मागणी दिसून येत आहे. दुपारी ‘देशी बी-बियाणे काळाची गरज’ हे चर्चासत्र रंगले. या चर्चासत्रात देशी बियाणांचे महत्त्व, त्यांचे जतन करण्याच्या पद्धती, त्यांची उपयुक्तता, त्याचे उत्पादन, होणारा फायदा, घ्यावयाची काळजी आदी पैलूंवर सविस्तर चर्चा झाली. सायंकाळी कृषी सांस्कृतिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळाली. प्रदर्शनासाठी मोफत प्रवेश असून, रविवारपर्यंत ते चालणार आहे.
विक्रमी संख्येचा वधूवर मेळावा
महोत्सवाअंतर्गत आयोजित वधूवर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विवाहेच्छुक वधूवर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहर, जिल्हा व राज्यस्तरातून जवळपास २५०० इच्छुक यात सहभागी झाले होते. सेवामार्गाअंतर्गत विवाह नोंदणीत उपलब्ध असलेली व प्रदर्शनस्थळी नव्याने झालेल्या स्थळांच्या नोंदणीची माहिती यावेळी सर्व उपस्थितांना देण्यात आली. या मेळाव्याच्या माध्यमातून भविष्यकाळात जे विवाह जमणार आहेत ते गुरूपीठावर सामुदायिक विवाह सोहळ्यात मोफत होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. नाशिकच्या धर्मादाय आयुक्तांच्या पुढाकाराने आत्महत्याग्रस्त व गरीब शेतकºयांच्या मुला-मुलींचे विवाह धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या व सेवाभावी धार्मिक संस्थांच्या मदतीने होणार आहे. या उपक्रमासाठी सेवामार्ग व कृषी महोत्सवाच्या वतीने ५१००० रपयांचा धनादेश धर्मादाय आयुक्त प्रदीप घुले यांना आबासाहेब मोरे यांच्या हस्ते देण्यात आला.

Web Title: Lectures, Meetings: Feedback on Nashik Krushi Mahotsav for Agriculture Literature, Stove of Homework

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती