स्मार्ट इंडिया हॅकेथॉनची पुर्व तयारीवर व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 05:49 PM2019-01-04T17:49:02+5:302019-01-04T17:49:13+5:30
चांदवड - चांदवड येथील एस.एन.जे.बी. संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक आणि ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट विभागातंर्गत चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यासाठी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१९ ची पुर्वतयारी या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले
चांदवड - चांदवड येथील एस.एन.जे.बी. संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक आणि ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट विभागातंर्गत चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यासाठी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१९ ची पुर्वतयारी या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले यासाठी क्लटर मॅनेजर एफटीटीएक्स इंजिनिअर आॅफ रिलायन्स जिओ इन्फोकॉम लि. अहमदनगरचे संदीप गांगुर्डे हे उपस्थित होते. त्यांनी रिलायन्स जिओमधील नोकरीचय विविध संधी विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच ते स्वता स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१७ चे विजेता होते.त्यामुळे हॅकेथॉन स्पर्धेची पुर्वतयारी कशी करावयाची यावर आपले अनुभव सांगुन विद्यार्थ्यांना संबोधीत केले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. पंकज कापसे, प्रा. संतोष अंभोरे,प्रा. माधुरी कवडे यांनीविभागप्रमुख डॉ. महेश संघवी व प्राचार्य डॉ. एम.डी.कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे समन्वयक दिनेशकुमार लोढा, झुंबरलाल भंडारी, सुनीलकुमार चोपडा व प्राध्यापक उपस्थित होते.