संविधान साक्षरता अभियानांतर्गत व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 11:47 PM2020-02-23T23:47:39+5:302020-02-24T00:48:28+5:30
संविधान साक्षरता अभियानांतर्गत शिवजयंतीनिमित्त शनिवारी ‘वर्तमानातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने’ या विषयावर प्रा. डॉ. सतीश म्हस्के यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. देवराम जाधव होते.
सायने बुद्रुक : येथे संविधान साक्षरता अभियानांतर्गत शिवजयंतीनिमित्त शनिवारी ‘वर्तमानातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने’ या विषयावर प्रा. डॉ. सतीश म्हस्के यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. देवराम जाधव होते.
‘भारतीय संविधानाची पार्श्वभूमी व निर्मितीनंतरची आव्हाने’ यावर त्यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक मानवासाठी व मानवी उत्कर्षासाठी संविधान महत्त्वाचे आहे. भारतीय संविधान हा वाचन करण्यापुरता मर्यादित ग्रंथ नसून तो अंमलबजावणीचा आणि सर्वसामान्य माणसाच्या अस्तित्वाला अधोरेखित करणारा ग्रंथ आहे, असे प्रा. डॉ. म्हस्के यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानवतावादी बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शिवदास म्हसदे यांनी केले. संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन संतोष कांबळे यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय मच्छिंद्र तेली यांनी करून दिला. सुनील वाघ यांचेही भाषण झाले. भन्ते प्रज्ञादीप यांनी त्रिशरण व पंचशील सादर केले. सूत्रसंचालन अमोल जगताप यांनी केले. आभार विशाल धिवरे यांनी मानले. यावेळी डॉ. चंद्रकांत पवार, जयपाल त्रिभुवन, आर. आर. जगताप, पोपट पगार, रमेश पवार, विठ्ठल बागुल, शंकर सोनवणे, अशोक खरे, जे. डी. पवार आदी उपस्थित होते.