द्राक्षबागांना ‘डावण्या’ रोगाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 02:58 PM2019-10-11T14:58:34+5:302019-10-11T14:58:45+5:30
वणी : वातावरणातील बदल आणि हवामानातील विषमता अशा निसर्गाच्या प्रतिकुलतेमुळे दिंडोरी तालुक्यातील काही भागांमधील द्राक्षबागांवर ‘डावण्या’ रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून उत्पादनात घट येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
वणी : वातावरणातील बदल आणि हवामानातील विषमता अशा निसर्गाच्या प्रतिकुलतेमुळे दिंडोरी तालुक्यातील काही भागांमधील द्राक्षबागांवर ‘डावण्या’ रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून उत्पादनात घट येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दिंडोरी तालुक्यातील काही भागांमधे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दमट हवामान आर्द्रतेचे वाढलेले प्रमाण याचा प्रतिकुल परिणाम झाला असुन द्राक्षबागांची पाने व घडांच्या हाणीमुळे ऊत्पादन क्षमतेवर याचा परिणाम होतो आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी महागङ्या औषधांची फवारणी करणे एवाढेच उत्पादकांच्या हातात आहे. दिंडोरी तालूक्यात हजारो एकर द्राक्ष बागांचे शेतीक्षेत्र असुन द्राक्षबागांची प्रतिवर्षी लागवड असे समीकरण आहे. उत्पादन व खर्च याचा ताळमेळ बसविताना नेहमी कोणत्या न कोणत्या रु पाने संकट येते. त्यातुन मार्ग काढताना तारेवरची कसरत करणारे उत्पादक निसर्गाच्या लहरीपणापुढे हतबल होतात, असेच चित्र सध्या तरी दिसते आहे. द्राक्षबागांबरोबर टमाटा या नगदी पिकांवरही विषम वातावारणामुळे करपा रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. द्राक्षाच्या बरोबरीने अडीअडचणीत हात देणारे पिक अशी या पिकाची ओळख आहे. सध्याच्या वातावरणात स्वच्छ आकाश मोकळा सुर्यप्रकाश थंडी अशा नैसर्गिक वातावरणाची अपेक्षा केली जात असताना अवकाळी पावसाच्या फटक्यामुळे नगदी पिकांचे अिस्तत्व धोक्यात आल्याने निराश व हताश झालेला शेतकरी अनुकूल वातावरणाच्या निर्मितीची प्रतिक्षा करीत आहे.