डाव्या चळवळीचा उर्जास्रोत हरपला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:15 AM2021-04-04T04:15:03+5:302021-04-04T04:15:03+5:30

नाशिक : वयाने ज्येष्ठ असूनही तरुणांना लाजवेल इतक्या वेगाने काम करतानाच शेतकरी, कामगार आणि शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या विरोधात लढणारे लढवय्ये ...

Left movement loses energy! | डाव्या चळवळीचा उर्जास्रोत हरपला!

डाव्या चळवळीचा उर्जास्रोत हरपला!

Next

नाशिक : वयाने ज्येष्ठ असूनही तरुणांना लाजवेल इतक्या वेगाने काम करतानाच शेतकरी, कामगार आणि शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या विरोधात लढणारे लढवय्ये कॉ. श्रीधर देशपांडे यांचे निधन धक्कादायक आहे. विविध समाज घटकांशी आणि क्षेत्रांशी नाळ जुळलेला मित्र, मार्गदर्शक हरपल्याची भावना पुरोगामी चळवळीतील मान्यवरांनी व्यक्त केल्या. कॉ. देशपांडे अत्यंत अभ्यासू होते. त्यांच्या बोलण्यातून आणि लिखाणातून ते सातत्याने जाणवत असे. कम्युनिस्ट चळवळीचा चालता बोलता इतिहास असलेले कॉ. देशपांडे यांच्या निधनामुळे डाव्या चळवळीला धक्का बसला आहे. तशा संवदेना मान्यवरांनी व्यक्त केल्या.

कोट...

शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सतत लढा देणारे कॉ. देशपांडे हे डाव्या पुराेगामी चळवळीतील एक महत्त्वाचे होते. विमा कर्मचाऱ्यांचे नेते म्हणून पाच दशके त्यांनी भरीव कार्य केले. माकप आणि सीटूमध्ये नेतृत्वदायी भूमिका बजावली. बंद पडलेल्या बँका आणि पतसंस्थांच्या ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या निधनामुळे डाव्या पुरोगामी चळवळीची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.

- छगन भुजबळ, पालकमंंत्री, नाशिक

कोट...

माकपाचे आणि डाव्या चळवळीचे ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक, विचारवंत तथा कृतिशील लेखक कॉ. देशपांडे यांचे निधन झाले. त्यामुळे कामगार आणि कष्टकऱ्यांच्या लढ्यातील तेजस्वी तारा निखळला. अखेरच्या क्षणापर्यंत विचारांशी इमान राखणारे कॉ. देशपांडे अमर आहेत.

- मनीष बस्ते, माजी उमहापौर, शेकाप

कोट...

शेतकरी, कामगार आणि अन्य वंचितांसाठी लढणारे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले कॉ. देशपांडे यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाली आहे. एक सहृदयी मित्र, मार्गदर्शक हरपला आहे.

- तानाजी जायभावे, माजी नगरसेवक, माकपा.

कोट...

माकपाचे ज्येष्ठ नेते, कामगार चळवळीसाठी आयुष्य वेचणारे, कम्युनिस्ट ऐक्यासाठी आग्रही भूमिका धरणारे कॉ. देशपांडे यांची ओळख होती. जिल्ह्यातील बंद पडलेल्या बँका आणि पतसंस्थामुळे अडलेल्या ठेवीदारांच्या न्याय्य हकासाठी त्यांनी लढा दिला. नाशिक जिल्ह्यातील सर्वच पक्षनेत्यांशी त्यांचे अत्यंत स्नेहाचे संबंध होते. त्यांच्या निधनामुळे ‌डाव्या चळवळीची हानी झाली आहे.

- कॉ. राजू देसले, राज्य सचिव मंडळ सदस्य, भाकपा

कोट...

कॉ. देशपांडे अत्यंत खिलाडू वृत्तीचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांची मार्क्सवादाची खूप चांगली बैठक होती. शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता. गुलालवाडी व्यायामशाळा ते माकप व्हाया एलआयसी असा त्यांचा प्रवास होता. नाशिकच्या सामाजिक-राजकीय चळवळीचा चालता बोलता इतिहास हरपला आहे.

- प्रा. मिलिंद वाघ, सचिव शिक्षण बाजारीकरण विरोधीकरण विरोधी मंच

Web Title: Left movement loses energy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.