बिबट्याच्या हल्ल्यातून ऊसतोड कामगार बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 03:26 PM2018-12-29T15:26:56+5:302018-12-29T15:27:03+5:30
सिन्नर : तालुक्यातील बेलू येथे ऊसतोड सुरू असताना ऊसतोड कामगारावर ऊसात लपलेल्या बिबट्याने डरकाळी फोडत झेप घेवून जखमी केल्याची घटना शुक्रवार (दि.२८) रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.
सिन्नर : तालुक्यातील बेलू येथे ऊसतोड सुरू असताना ऊसतोड कामगारावर ऊसात लपलेल्या बिबट्याने डरकाळी फोडत झेप घेवून जखमी केल्याची घटना शुक्रवार (दि.२८) रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. प्रसंगावधान राखत ऊसतोड मुकादम विठ्ठल सोनवणे यांनी बिबट्यावर हातातील कोयता उगारत पळ काढल्याने ते बिबट्याच्या हल्ल्यातून बचावले. शुक्रवारी तालुक्यातील बेलू येथील कडवा कालव्याजवळ शरद निवृत्ती तुपे यांच्या शेती गट नंबर १३० मधील उसाच्या शेतात सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ऊसतोड कामगार शेतावर आल्यानंतर काम सुरू करणार तोच बिबट्याने डरकाळी फोडली. मुकादम विठ्ठल पुंजाराम सोनवणे हे स्वत: हातात कोयता घेवून ऊसाच्या शेतात घुसलेअसता पट्टाची बिबट्या मादी आणि तिचे दोन बछडे दिसले. त्यांना काही कळायच्या आतच मादीने जोरदार डरकाळी फोडत मुकादम सोनवणे यांच्या दिशेने झेप घेतली. यावेळी हिंमत एकवटून सोनवणे यांनी हातातील कोयता तिच्या समोर उगारत उलटे पळून स्वत:चा जीव वाचविला. दरम्यान, बिबट्याची मादी आणि तिच्या बछड्यांचा वावर लक्षात आल्याने शरद तुपे यांच्या शेतातील ऊसतोड बंद करण्यात आली. दरम्यान, शुक्रवारी पहाटे याच ऊसाच्या शेजारी असलेल्या शंकर तुपे यांच्या बंगल्याच्या गच्चीवर कुत्र्याचाही या फडशा पाडला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ऊसतोड मजुरांसह स्थानिकांना सावधगिरीच्या सुचना त्यांनी दिल्या.