निफाडला कायदेविषयक जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 12:51 AM2018-11-08T00:51:22+5:302018-11-08T01:13:36+5:30

निफाड : महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई व स्वामी विवेकानंद सामाजिक, सार्वजनिक सेवा संस्था, निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने निफाड येथे महिलांविषयी कायदे जागृती कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्र माचे उद्घाटन आमदार अनिल कदम व जिल्हा परिषद सदस्य कलावती हरिश्चंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

Legal Awareness to Nifad | निफाडला कायदेविषयक जागृती

निफाडला कायदेविषयक जागृती

Next
ठळक मुद्देकायद्यांची तपशीलवार माहिती सांगितली.

निफाड : महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई व स्वामी विवेकानंद सामाजिक, सार्वजनिक सेवा संस्था, निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने निफाड येथे महिलांविषयी कायदे जागृती कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्र माचे उद्घाटन आमदार अनिल कदम व जिल्हा परिषद सदस्य कलावती हरिश्चंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्तविक स्वामी विवेकानंद सामाजिक, सार्वजनिक सेवा संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष शंकर वाघ, यांनी केले. निफाडच्या नगरसेवक मोनाली वाघ यांनी प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले. आमदार अनिल कदम यांचे भाषण झाले.
याप्रसंगी निफाड तहसीलच्या संजय गांधी निराधार योजना विभागाच्या नायब तहसीलदार पूनम दंडिले यांनी मतदार नोंदणी व निराधार महिलांविषयी असलेल्या योजनांविषयी माहिती दिली, महिला आघाडीच्या अध्यक्षा रोहिणी नायडू यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोग व तक्र ार निवारण समिती व तिचे कार्य याविषयी माहिती दिली. वैशाली आडके, जयश्री वानखेडे, सुवर्णा जगताप यांनी महिलांच्या समस्यांविषयी कायद्याप्रती तपशीलवार माहिती सांगितली.
ज्येष्ठ विधिज्ञ वाल्मीकराव गायकवाड यांनी मुलीला संपत्तीत असणारा अधिकार, हुंडाबळी, हिंदू वारस हक्क याविषयी माहिती दिली. निफाड नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी शासकीय व अशासकीय ठिकाणी नोकरी करणाऱ्या महिलांना येणाºया अडचणी व समस्येला तोंड देऊन कसं काम करावं याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी मंजूषा पाटील, स्मिता कुलकर्णी, वैशाली बनकर, डॉ. सीमा डेर्ले, ऐश्वर्या जगताप, ऐश्वर्या वाघ, सरला कुयटे, प्रियंका वाघ, सविता वाघ, उषा अहेर, विजय शिंदे, सुनील माळी, झुंबरबाई कराटे, सुमनताई बर्डे, निर्मला पवार, पंढरीनाथ पिठे, परेश शहा, नगरसेवक जावेद शेख, आनंद बिवलकर, नगरसेवक मोनली वाघ, दत्तू सुडके, इरफान सय्यद, संजय कुंदे, अ‍ॅड. रमेश ठाकरे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन अ‍ॅड. शरद वाघ व अ‍ॅड. लक्ष्मण वाघ यांनी केले. आभार सीमा शिंदे यांनी केले.ज्येष्ठ विधिज्ञ माधव वाघ यांनीही महिलांच्या कायद्याविषयी माहिती दिली. निफाड उपजिल्हा रु ग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.आर. राठोर यांनी स्त्रियांच्या आरोग्याविषयी व त्या अनुषंगाने असणाºया कायद्याविषयी माहिती दिली. ज्येष्ठ विधिज्ञ सरोज चंद्रात्रे यांनी आपल्या ग्रामीण शैलीत सायबर क्राइम, महिलांना कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ, कौटुंबिक हिंसाचार, आदीविषयी कायद्यांची तपशीलवार माहिती सांगितली.

Web Title: Legal Awareness to Nifad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस