अंदरसूल येथे कायदेविषयक शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 11:55 PM2019-04-05T23:55:11+5:302019-04-05T23:56:37+5:30
अंदरसूल : दिवाणी व फौजदारी न्यायालय येवला, तालुका विधी सेवा प्राधिकरण, येवला बार असोसिएशन व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने अंदरसूल येथे फिरते न्यायालय व मोफत कायदेविषयक शिबिर घेण्यात आले. अध्यक्षस्थानी येवला न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खोल्लम होते.
अंदरसूल येथे घेण्यात आलेल्या फिरते न्यायालय व कायदेविषयक शिबिराच्या दीपप्रज्वलनप्रसंगी मुख्य न्यायाधीश खोल्लम. समवेत अॅड. एस. टी. कदम, अॅड. वसईकर व बार असोसिएशनचे सदस्य.
अंदरसूल : दिवाणी व फौजदारी न्यायालय येवला, तालुका विधी सेवा प्राधिकरण, येवला बार असोसिएशन व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने अंदरसूल येथे फिरते न्यायालय व मोफत कायदेविषयक शिबिर घेण्यात आले. अध्यक्षस्थानी येवला न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खोल्लम होते.
येवला न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खोल्लम यांनी रस्ते वहिवाट कायदा व अधिकार याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी अॅड. एस.टी. कदम, अॅड. वासाईकर यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले.
या लोकअदालतीमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने ३०० केसेस ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी ६९ केसेस निकाली निघाल्या असून, त्यापोटी ग्रामपंचायतीचा घरपट्टी ५३,१९० रु. व पाणीपट्टी १२,८२८० रुपये वसूल झाली. उर्वरित २३१ थकबाकीधारकांचे नळ कनेक्शन मंगळवारी खंडित करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच विनिता सोनवणे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब बोराडे व ग्रामपंचायत प्रशासनाने दिली. याप्रसंगी सरकारी वकील अॅड. वैष्णव, येवला बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. कदम, येवला येथील ज्येष्ठ वकील व नोटरी अॅड. बाबासाहेब देशमुख, गटविकास अधिकारी शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक ताटीकोंडीलवार, हरिभाऊ जगताप, किसनराव धनगे, मकरंद सोनवणे, भागीनाथ थोरात, झुंजारराव देशमुख, अॅड. किरण देशमुख, वसईकर, नाजगड, रोहिदास लोंढे, विक्रांत गायकवाड, रवींद्र गायकवाड, राजेंद्र तिवारी आदी उपस्थित होते.