सटाणा न्यायालयात कायदेविषयक शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 06:00 PM2021-02-26T18:00:15+5:302021-02-26T18:01:27+5:30

सटाणा : येथील न्यायालयात जागतिक सामाजिक न्याय दिन उत्सवात साजरा करण्यात आला. यानिमित्त कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी न्यायाधीश विक्रम आव्हाड होते.

Legal camp at Satana Court | सटाणा न्यायालयात कायदेविषयक शिबिर

सटाणा न्यायालयात कायदेविषयक शिबिर

googlenewsNext

शिबिरात सटाणा न्यायालयाचे विधिज्ञ प्रणव भामरे यांनी उपस्थितांना माहितीचा अधिकार अधिनियम २००५ बद्दल मार्गदर्शन केले. तालुका विधि सेवा समितीचे अध्यक्ष तथा न्यायाधीश आव्हाड यांनी सामाजिक न्याय दिन साजरा करण्यामागचा उद्देश तसेच सामाजिक न्याय विभागांतर्गत कोणकोणते विभाग अथवा योजना येतात, याबाबत सखोल मार्गदर्शन केले. नाशिक वकील फेडरेशनचे अध्यक्ष तथा सटाणा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. पंडितराव भदाणे यांच्यासह पक्षकार, सटाणा न्यायालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Legal camp at Satana Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.