कौटुंबिक हिंसाचारापासून कायदेशीर संरक्षण मीनल केंगे : ई अ‍ॅण्ड जी फाउंडेशनचा कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 01:31 AM2018-03-09T01:31:24+5:302018-03-09T01:31:24+5:30

नाशिक : महिलांवर होणारे अत्याचार व घरगुती हिंसाचारला आळा घालण्यासाठी २००५ सालापासून कौटुंबिक हिंसाचारविरोधी संरक्षण कायदा अस्तित्वात आला आहे.

Legal Protection from Family Violence Mineral Keenge: The program of the E & G Foundation | कौटुंबिक हिंसाचारापासून कायदेशीर संरक्षण मीनल केंगे : ई अ‍ॅण्ड जी फाउंडेशनचा कार्यक्रम

कौटुंबिक हिंसाचारापासून कायदेशीर संरक्षण मीनल केंगे : ई अ‍ॅण्ड जी फाउंडेशनचा कार्यक्रम

Next
ठळक मुद्देमहिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन महिलांनी पुरुषांप्रमाणेच कठोर परिश्रम घेण्याची तयारी ठेवावी

नाशिक : महिलांवर होणारे अत्याचार व घरगुती हिंसाचारला आळा घालण्यासाठी २००५ सालापासून कौटुंबिक हिंसाचारविरोधी संरक्षण कायदा अस्तित्वात आला आहे. या कायद्यामुळे महिलांना पाठबळ लाभले असून, त्यांचे संरक्षण होत आहे, मात्र या कायद्याविषयीची जागृती समाजात व्यापक पद्धतीने होणे गरजेचे आहे, असे मत अ‍ॅड. मीनल केंगे यांनी व्यक्त केले. ई अ‍ॅण्ड जी वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिलादिनानिमित्त महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी केंगे कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायद्याबाबत बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, यापूर्वीची आणि सध्याची महिलांविषयीची परिस्थती बदलली आहे. महिलांवरील अन्याय रोखण्यासाठी कायदे अधिकाधिक भक्कम करण्यात आले आहे. महिलांवरील अन्यायाविरुद्ध थेट न्यायालयातही दाद मागू शकतात, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, न. भ. ठाकूर विधी महाविद्यालयाच्या प्रा. मेधा सायखेडकर देखील यावेळी उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, महिलादिनाच्या निमित्ताने महिलांचा समाजाने सन्मान-आदर करण्याबरोबर नेहमीच महिलांना समानतेची व सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. महिलांनी ध्येय डोळ्यासमोर ठेवून ते साध्य करण्यासाठी पुरुषांप्रमाणेच कठोर परिश्रम घेण्याची तयारी ठेवावी.

Web Title: Legal Protection from Family Violence Mineral Keenge: The program of the E & G Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.