फि रते विधी सेवा व लोक अदालत योजना
By admin | Published: July 2, 2014 10:01 PM2014-07-02T22:01:09+5:302014-07-03T00:08:51+5:30
फि रते विधी सेवा व लोक अदालत योजना
एक स्तुत्य उपक्रम़़़
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणामार्फ त ‘न्याय आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला जातो़ यासाठी फि रते विधी सेवा केंद्र व लोकअदालतीचे आयोजन केले जाते़ नाशिक जिल्ह्यात १६ ते ३० जून या कालावधीत मोबाईल व्हॅनचा उपक्रम राबविण्यात आला़ जिल्ह्यातील १६ ठिकाणी ही व्हॅन जाऊन लोकअदालतीचा उपक्रम राबविण्यात आला़ यामध्ये एकूण ६७३ (फ ौजदारी व दिवाणी) दावे ठेवण्यात आले होते़ त्यापैकी ३१२ दावे निकाली काढण्यात आले़
- राजेश पटारे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नाशिक़
असा होता जूनमधील दौरा़़़
‘न्याय आपल्या दारी’ या उपक्रमातील मोबाइल व्हॅनचा नाशिक जिल्हा दौऱ्याचा कालावधी हा १६ ते ३० जून या कालावधीत होता़ १६ जूनला नाशिक, १७ जून- इगतपुरी, १८ जून- सिन्नर, १९ जून- पिंपळगाव व चांदवड, २० जून- नांदगाव व मनमाड, २१ जून- मालेगाव, २३ जून- येवला, २४ जून- निफ ाड, २५ जून- सुरगाणा, २६ जून- दिंडोरी, २७ जून- कळवण, २८ जून- सटाणा, ३० जून- नाशिकरोड या ठिकाणी जाऊन लोकअदालत घेण्यात आली़
व्हॅनमधील सदस्य व त्यांची जबाबदारी़़़
ल्लनिवृत्त किंवा कार्यरत न्यायिक अधिकारी
ल्लवकिल / सरकारी अधिकारी
ल्लकायद्याचे विद्यार्थी / शिक्षक
ल्लसदर भागातील सामाजिक कार्यकर्ता
ल्लसंबंधित भागात लोकांवर चांगला असलेली व्यक्ती़
ल्लस्थानिक भाषेत नव्या कायद्यांची माहिती देणे़
ल्लशिबिरास येणाऱ्यांना समुपदेश व सल्ला देणे़
ल्ललोक अदालत दरम्यान पक्षकारांमधील वादाचे निराकरण, समेट व समझोता घडवून आणणे़
ल्लवाद दाखल करावयाचा असल्यास विधी सेवा व विधी सहाय्याबद्दल माहिती देणे़