त्र्यंबकेश्वरवर जडले प्रख्यात अभिनेते सयाजी शिंदे यांचे प्रेम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 07:23 PM2018-10-24T19:23:50+5:302018-10-24T19:27:24+5:30
त्र्यंबकेश्वर : गत अडीच तीन मिहन्यांपुर्वी त्र्यंबकेश्वर येथील सदगुरु संत जनार्दन स्वामी महाराज आश्रमात संत जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या सुचने वरु न सुप्रसिध्द अभिनेते सयाजी शिंदे खास आपले पर्यावरण या संस्थेतर्फे आश्रमाच्या परिसरात पाच हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ केला होता. ती झाडे केवढी झाली आहेत. झाडे जगली की नाहीत याबाबत पाहणी करण्यासाठी वृक्ष प्रेमी पर्यावरण प्रेमी असलेले सयाजी शिंदे त्र्यंबकेश्वर येथील संत जनार्दन स्वामी आश्रमात आले होते.

योगायोगाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आण िस्वत: पर्यावरण प्रेमी असल्याने ते मुद्दाम आपण लावलेल्या झाडांची सद्यस्थिती काय आहे याबाबतची माहिती घेण्या करिता त्र्यंबकेश्वर येथे आले होते.
विशेष म्हणजे हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील त्र्यंबकेश्वर येथील उभरती कलाकार पुजा राज कानकटे ही अभिनेत्री सध्या आपल्या आई विडलांकडे आपल्या गावी आली होती. तत्पुर्वी मुंबई येथे सयाजी शिंदे यांनी मी त्र्यंबकेश्वर येथे लावलेली झाडे पाहण्या करीता येणार आहे.असे म्हटले होते. त्यावेळी पुजा राज हीने आमच्या घरी या असे निमंत्रण दिले होते.
सयाजी शिंदे त्र्यंबकला आल्यावर आवर्जुन व आठवणीने आपल्या को कलाकाराच्या घरी जाउन सदिच्छा भेट दिली. यावेळी छोट्याशा घरात पुजाचे वडील राजेंद्र कानकटे व भाजप सरचिटणीस हर्षल भालेराव यांनी त्यांचा सत्कार केला. विशेष म्हणजे आपल्या सह कलाकाराच्या घरी जाउन आस्थेने विचारपुस करु न सदिच्छा भेट दिली. भोजन केले यातच त्यांचा मोठेपणा दिसुन येतो.
संत जनार्दन स्वामी महाराज आश्रमात लावलेल्या झाडांची प्रगती पाहुन त्यांनी समाधान व्यक्त केले. त्या नंतर ते ब्रम्हगिरी परिसरातील भातखळे आदी भागात येथील आयपीएल या निसर्ग प्रेमी व पर्यावरणवादी संस्थेने वृक्षारोपण पाणी अडवुन झाडांच्या मुळाशी पाणी जिरवणे झाडांना ओटे बांधणे आदी विविध कामे सुरु केली आहेत. या पाशर््वभूमीवर या कामांना सयाजीराव शिंदे यांनी भेट देउन सर्व कामांची प्रशंसा केली. या वेळी आयपीएल ग्रुपचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष ललित लोहगावकर व मंडळाचे सर्व सदस्य यांचा शिंदे यांनी सत्कार केला. तर मंडळातर्फे श्री. ललित लोहगावकर यांनी सयाजी शिंदे यांचा सत्कार केला. या वेळी त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर उपनगराध्यक्ष स्विप्नल शेलार गटनेते समीर पाटणकर नगरसेवक कैलास चोथे सागर उजे आदींच्या उपस्थितीत सयाजी शिंदे यांचा सन्मान केला.