विधान परिषदेच्या मतदारांना बाळगावा लागेल मतदानासाठी पुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 04:01 PM2018-05-19T16:01:14+5:302018-05-19T16:01:14+5:30
मोजकेच मतदार असलेल्या या निवडणुकीसाठी मतांची फोडाफोडी केली जाते. अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारांकडून मतदारांना आपल्याकडे खेचून घेण्याचे हरत-हेचे प्रयत्न केले जातात व त्यासाठी साम-दाम-दंड-भेद नितीचा अवलंब केला जात असल्यामुळे मतदार देखील उमेदवारांप्रती
नाशिक : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान करू इच्छिणाऱ्या मतदारांना मतदानासाठी आपल्या ओळखीचा पुरावा सक्तीचा करण्यात आला असून, अतिशय चुरशीच्या असलेल्या या निवडणुकीत मतदारांकडून गोपनियतेचा भंग होण्याची शक्यता गृहीत धरून आयोगाने त्यासंदर्भात विशेष सुचना मतदान केंद्राध्यक्षांना दिल्या असून, गुप्त मतदानाचा भंग केल्यास त्या मतदाराची मतपत्रिका जप्त करून त्याच्या विरूद्ध फौजदारी कारवाई करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.
मोजकेच मतदार असलेल्या या निवडणुकीसाठी मतांची फोडाफोडी केली जाते. अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारांकडून मतदारांना आपल्याकडे खेचून घेण्याचे हरत-हेचे प्रयत्न केले जातात व त्यासाठी साम-दाम-दंड-भेद नितीचा अवलंब केला जात असल्यामुळे मतदार देखील उमेदवारांप्रती आपली निष्ठा दाखविण्यासाठी मतदान केंद्रात मतदानासाठी गेल्यावर मतपत्रिकेशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारच्या घटना यापुर्वी घडल्या असल्यामुळे निवडणूक आयोगाने यावेळी मतदान केंद्रात जातांना मतदारांना पेन, भ्रमणध्वनी, पेजर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तु नेण्यास पुर्णत: बंदी घातली असून, मतदाराव्यतिरीक्त अन्य दुसºया व्यक्तीस मतदान केंद्रात परवानगी नाकारण्यात आली असून, एका वेळी एकाच मतदाराला मतदान कक्षात प्रवेश देण्यात येणार आहे. मतदाराने निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच पसंती क्रम लिहीण्यासाठी सक्ती करण्यात आली असून, ओळख पटविण्यासाठी मतदाराने मतपत्रिकेवर अन्य काही खूण केल्यास मतपत्रिकाच बाद करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. शिवाय गुप्त मतदानाचा भंग करणाºया मतदाराची मतपत्रिका जप्त करण्याचे आदेश मतदान केंद्राध्यक्षांना देण्यात आल्या असून, शिवाय गोपनियतेचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.