विधानसभा उमेदवारीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 04:25 PM2019-06-23T16:25:00+5:302019-06-23T16:25:33+5:30

जळगाव नेऊर..महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला तालुका दौऱ्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन पार पडले, त्यांनी आज जळगाव नेऊर येथे मुलभूत सुविधा अंतर्गत झालेले रक्कम रु पये १०लक्ष निधीच्या वाचनालयाचे उद्घाटन यांच्या हस्ते पार पडले,यावेळी जळगाव नेऊर येथील सभेत कार्येकर्त्यांनी विधानसभेसाठी छगन भुजबळ यांनी येवल्यातून उमेदवारी करण्याचा आग्रह धरला असता, तो निर्णय पक्षश्रेष्ठीचा आहे. असे सांगितले.

 Legislature will take decision-making decision | विधानसभा उमेदवारीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार

 येवला तालुक्यातील जळगाव नेऊर मुलभूत सुविधा अंतर्गत वाचनालयाचे उद्घाटन करतांना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, वसंत पवार, सरपंच हिराबाई शिंदे, उपसरपंच श्रीदेव शिंदे. 

Next
ठळक मुद्देयेवला: तालुक्यात भुजबळांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन

जळगाव नेऊर..महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला तालुका दौऱ्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन पार पडले, त्यांनी आज जळगाव नेऊर येथे मुलभूत सुविधा अंतर्गत झालेले रक्कम रु पये १०लक्ष निधीच्या वाचनालयाचे उद्घाटन यांच्या हस्ते पार पडले,यावेळी जळगाव नेऊर येथील सभेत कार्येकर्त्यांनी विधानसभेसाठी छगन भुजबळ यांनी येवल्यातून उमेदवारी करण्याचा आग्रह धरला असता, तो निर्णय पक्षश्रेष्ठीचा आहे. असे सांगितले.
धुळगाव येथे पालखेड कालव्यावर कि.मी. ८८/८०० मध्ये डायरेक्ट आऊटलेट एस के एफ गेटचे बांधकाम करणे कामाचे उद्घाटन तसेच अंगणगांव येथील मुलभूत सुविधा अंतर्गत झालेले वाचनालयाचे उद्घाटन (अंदाजे किंमत १० लक्ष)व चिचोंडी खुर्द येथे स्थानिक विकास निधीतुन सभामंडपाचे बांधकाम भुमीपूजन (अंदाजे किंमत ७ लक्ष) अशा विविध विकासकामांचे उद्घाटन भुजबळांच्या हस्ते झाले. तसेच जिल्हा बँकेने शेतकº्यांच्या शेतजमिनीचा लिलावाचा मुद्दा विधानसभा अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडुन सरकारचे लक्ष वेधल्याचे भुजबळांनी सांगितले,तसेच तालुक्यात केलेल्या विविध विकासकामांची माहिती सांगितली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष साहेबराव मढवई, अरु ण थोरात, वसंत पवार, मोहन शेलार , शेतकरी संघटनेचे संतू पाटील झांबरे, बाजार समिती संचालक बाळासाहेब गुंड व नवनाथ काळे, माजी सभापती प्रकाश वाघ, सरपंच हिरावाई शिंदे, उपसरपंच श्रीदेव शिंदे ,साताळीचे सरपंच भाऊसाहेब कळसकर, जयाजी शिंदे, दीपक लोणारी, माजी सरपंच हिराबाई शिंदे, वाल्मीक सोनवणे, भगवान शिंदे, शिवाजी शिंदे ,भाऊसाहेब धनवटे, मच्छिंद्र शिंदे, बबन शिंदे, भाऊसाहेब शिंदे,बाजीराव सोनवणे, आबासाहेब घुले, भास्कर मराठ,े संतोष राजगुरू, गोविंद तांबे,, विशाल शिखरे, माजिद शेख, रावसाहेब कुराडे उपस्थित होते.

Web Title:  Legislature will take decision-making decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.