आज उधार उद्या नव्हे....सहा महिन्यांनी रोख !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 12:44 PM2020-01-08T12:44:50+5:302020-01-08T12:45:59+5:30
नायगाव (दत्ता दिघोळे)- प्रत्येक छोटया-मोठ्या दुकानांमध्ये ‘आज रोख उद्या उधार’ असा फलक हमखास वाचायला मिळतो. मात्र सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे परराज्यातून आलेला कापड व्यापारी ‘आज उधार अन्.... सहा महिन्यांनी रोख’ अशा अनोख्या पद्धतीने धंदा करत असल्यामुळे या उधारीच्या धंद्याची नायगाव खो-यात चांगलीच चर्चा रंगत आहे.
ऐकावे ते नवलच : नायगाव खोऱ्यात व्यापा-याच्या धंद्याबाबत रंगतेय चर्चा !
नायगाव (दत्ता दिघोळे)- प्रत्येक छोटया-मोठ्या दुकानांमध्ये ‘आज रोख उद्या उधार’ असा फलक हमखास वाचायला मिळतो. मात्र सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे परराज्यातून आलेला कापड व्यापारी ‘आज उधार अन्.... सहा महिन्यांनी रोख’ अशा अनोख्या पद्धतीने धंदा करत असल्यामुळे या उधारीच्या धंद्याची नायगाव खो-यात चांगलीच चर्चा रंगत आहे.
आज-कालच्या धकाधकीच्या जमान्यात कोणताही व्यवहार करतांना वस्तू खरेदीसाठी दुकानात किंवा माँलमध्ये आँनलाईन व कँशलेशची सुविधा उपलब्ध असल्याचा किंवा उधारी बंदचा बोर्ड हमखास दिसतो.मात्र अशा परिस्थतीत राजस्थानमधून आलेले कापड व्यापारी गेल्या आठवडाभरापासून नायगाव खो-यातील गावांमध्ये कांबळे (ब्लँकेट ) , सतरंजी, स्वेटर, जर्किंग, मफलर, कानटोपी, बेडसीट आदी उबदार कपडे विक्र ीस आणले आहे. हे सर्व कपडे हा व्यापारी रोखीऐवजी उधारीवर विकत आहे.यासाठी खरेदी करणा-याचे नाव,गावातीलच असल्याचा दोन गावक-यांची ओळख हे दोनच नियम एका कच्या कागदावर लिहून घेतले जाते.एका ग्राहकाला पाचशे ते पाच हजार रु पयांपर्यत कपडे खरेदी करता येऊ शकतात.तसेच उधारीचे पैसे चक्क सहा महिन्यांनी देण्याचा आग्रह खुद्द कापड व्यापारी ग्राहकांना करतांनाचे अजब चित्र येथे बघायला मिळते.
आपल्याकडे आज नगद...कल उधार, मैने उधार बेचा..मैने नगद बेचा अशा पध्दतीचे चित्रही ब-याच दुकानांमध्ये दिसते. येवढे करूनही एखाद्याला उधार द्यायचे असल्यास एखाद्याची ओळख,जामीनदार असे प्रकार असतात.उधारीच्या पैशांवरु न अनेकांचे भांडणे पोलीस तर काहींचे न्यायालयापर्यंत गेल्याचे बघायला मिळत असते.अशा परिस्थतीत अनेक दुकानदारांनी उधारीला कंटाळून चक्क दुकानदारी बंद केली.तर काहींनी फक्त रोखीचा व्यवहार सुरू ठेवला आहे. अशा बिकट परिस्थतीत ओळखीचा दुकानदार असला तरी उधारी म्हटल्यावर थोडेफार नाक मुरडण्याचा प्रकार अनुभवायला मिळतोच.अशा बेभरोशाच्या जमान्यात दुस-या राज्यात येऊन तेही अनोळखी व्यक्तींना चक्क उधारीत धंदा करण्याची या व्यापा-याची पध्दत संशोधनाचा विषय बनला असून याची नायगाव खो-यात चर्चाही चांगलीच रंगली आहे.