ऊसतोड सुरू असताना बिबट्याने दिले दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:31 AM2020-12-16T04:31:07+5:302020-12-16T04:31:07+5:30

एकलहरे शिवारातील परशराम कोंडाजी किरकाडे यांच्या शेतीच्या गट क्रमांक-२५६मध्ये ठेकेदारामार्फत त्यांनी ऊसतोड सुरू केली. यावेळी सकाळच्या सुमारास अचानकपणे कामगारांना ...

The leopard appeared while the cane was being cut | ऊसतोड सुरू असताना बिबट्याने दिले दर्शन

ऊसतोड सुरू असताना बिबट्याने दिले दर्शन

Next

एकलहरे शिवारातील परशराम कोंडाजी किरकाडे यांच्या शेतीच्या गट क्रमांक-२५६मध्ये ठेकेदारामार्फत त्यांनी ऊसतोड सुरू केली. यावेळी सकाळच्या सुमारास अचानकपणे कामगारांना बिबट्याच्या मादीने दोन पिलांसह दर्शन दिले. यावेळी सर्व कामगारांनी शेतीतून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. यावेळी मादीने उसातून बाहेर येत एका पिलाला घेऊन पुन्हा शेत गाठले. मात्र, दुसऱ्या पिलाला घेण्यासाठी ती लवकर परतली नाही. कारण, बिबट्या आल्याची माहिती वस्तीवर पसरल्याने बघ्यांनी गर्दी केली होती. लोकांचा गलका सुरू झाल्याने मादी आपल्या एका बछड्यासह उर्वरित ऊसशेतीत दडून बसली. याबाबतची माहिती वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांना कळविण्यात आली. त्यानंतर वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक गोविंद पंढरे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या परिसरात शोधमोहीम राबविली असता कामगारांनी सांगितलेल्या जागेत त्यांना एक बछडा आढळून आला. वनरक्षकांनी शेतीचा संपूर्ण परिसर तत्काळ निर्मनुष्य करत बछड्याला सुरक्षितरीत्या उसाच्या चिपाडाने झाकले. लोकांचा गोंधळ कमी होताच पुन्हा तासाभराने मादीने येऊन दुसऱ्या पिलालाही आपल्या ताब्यात घेत पुन्हा उसाची शेती गाठल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले.

----इन्फो---

खबरदारी घेण्याची सूचना

ऊस कापणीचा हंगाम असल्याने नागरिकांनी विशेषत: ऊसतोडीसाठी बांधावर पोहोचलेल्या कामगारांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. ऊसतोड करण्यापूर्वी संबंधित कामगारांना त्यांच्या सुपरवायझरकडून अथवा शेतकऱ्यांकडून फटाके उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. फटाके बांधावर वाजविल्याने कदाचित जर बिबट्या उसात असेल तर त्याच्या आवाजाने तो शेती सोडून जाईल आणि पुढील दुर्घटना टळण्यास मदत होईल, असे यावेळी अहिरराव यांनी उपस्थितांना सांगितले. या परिसरात उसाचे क्षेत्र अधिक असल्याने बिबट्याचे वास्तव्य असून, आपले पशुधन व लहान मुलांची काळजी कशी घ्यावी, याबाबत ध्वनिक्षेपकावरून वनविभागाच्या गस्तीपथकाने जनजागृती केली.

---

फोटो आर वर १६बिबट्या नावाने सेव्ह आहे.

Web Title: The leopard appeared while the cane was being cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.