डाबलीत बिबट्याचा हल्ला, वासरू ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 01:16 AM2021-11-19T01:16:17+5:302021-11-19T01:17:07+5:30

प्रवीण नामदेव हिरे यांच्या डाबळीत शेत वस्तीवर बांधलेल्या वासरावर गुुुरुवारी (दि.१८) पहाटेच्यासुमारास बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात वासरू ठार झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शेतशिवारात राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leopard attack in Dabli kills calf | डाबलीत बिबट्याचा हल्ला, वासरू ठार

डाबलीत बिबट्याचा हल्ला, वासरू ठार

Next

वडनेर : येथील प्रवीण नामदेव हिरे यांच्या डाबळीत शेत वस्तीवर बांधलेल्या वासरावर गुुुरुवारी (दि.१८) पहाटेच्यासुमारास बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात वासरू ठार झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शेतशिवारात राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या भागात पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

हिरे यांचे डाबली शिवारात शेत आहे. या भागात बिबट्याचे नेहमीच दर्शन होत असून, गुरुवारी पहाटे दीड ते दोनच्यासुमारास बिबट्याने हिरे यांच्या गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करुन ठार केले. डाबली, कंक्राळे रस्त्यावरून रात्री -अपरात्री ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचा बंदोबस्त करीत पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. या घटनेबाबत डाबली ग्रामपंचायतीच्यावतीने वनविभागाला निवेदन दिले आहे.

Web Title: Leopard attack in Dabli kills calf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.