शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:46 AM2019-03-10T00:46:38+5:302019-03-10T00:47:00+5:30
नाशिक तालुक्यातील गिरणारे गावाजवळील रानवस्तीतील नागटेंबी (नाईकवाडीरोड) येथील शेतात आपल्या मुलासोबत दुपारच्या सुमारास शेतात काम करीत असताना अचानक बिबट्याने शेतकऱ्यावर पाठीमागून हल्ला केला.
गंगापूर : नाशिक तालुक्यातील गिरणारे गावाजवळील रानवस्तीतील नागटेंबी (नाईकवाडीरोड) येथील शेतात आपल्या मुलासोबत दुपारच्या सुमारास शेतात काम करीत असताना अचानक बिबट्याने शेतकऱ्यावर पाठीमागून हल्ला केला. त्याचदरम्यान आजूबाजूच्या शेतात काम करणाºया शेतकऱ्यांनी धाव घेतल्यामुळे बिबट्याने घाबरून नजीकच्या शेतात पोबारा केला. दरम्यान, जखमी शेतकºयाला प्रथमोपचारासाठी जवळच्या खासगी दवाखान्यात नेऊन नंतर अधिक उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गिरणारे गावातील शेतकरी दीपक गणपत पिंगळे आपल्या लहान मुलासोबत नाईकवाडी रोडवरील रानवस्तीतील नागटेंबी परिसरातील शेतात काम करीत असताना बिबट्या व त्याची दोन पिल्ले त्याच परिसरात दबा धरून बसलेले होते. अचानक बेसावध असलेल्या व शेती कामात व्यस्त असलेल्या दीपक पिंगळे यांच्यावर बिबट्याने पाठीमागून झडप घेतली व त्यांच्या हात, पाय व पाठीचा लचका तोडण्याचा प्रयत्न केला. त्यावर पिंगळे यांनी आरडाओरड करून बिबट्याशी झुंज देण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान पिंगळे यांच्या शेजारच्या शेतात काम करणाºया शेतकºयांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी बिबट्याच्या दिशेने धाव घेतली असता, बिबट्या व त्याच्या दोन बछड्यांनी तेथून धूम ठोकली. दरम्यान, या घटनेची माहिती वाºयासारखी गाव परिसर, मळे परिसरात पसरताच, सर्वांनी पिंगळे यांच्या शेताकडे धाव घेतली. या भागात बिबट्याच्या खुलेआम होणाºया दर्शनाने नाशिक तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शेतकºयांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, शेतात काम करणे, शाळेत मुलांना सोडण्यास जाणे, शतपावलीसाठी रात्रीचे बाहेर निघणे कठीण झाले आहे. या भागातील बिबट्याला जेरबंद करून नागरिकांच्या मनातील भीती दूर करावी, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वीच अशा प्रकारची घटना गंगावºहे परिसरातील सुला वाइन रोडला असलेल्या धोंगडे वस्तीजवळ राजेंद्र फुलसुंगे यांच्या गोठ्यातील गाय, वासरावर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार मारले होते. त्यामुळे गिरणारे परिसरासह महादेवपूर, दुगाव, मनोली, मातोरी, मुंगसरा, वाडगाव, नाईकवाडी, मखमलाबाद, जलालपूर, चांदशी, नाशिक डावा कालव्याचे शेतमळे परिसरात बिबट्याच्या दर्शनाने नागरिक भयभीत झाले असून, त्यांना रात्री-अपरात्री घरातून बाहेर निघावे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
शासन नियमानुसार अर्थसहाय्य मिळणार
शेतात काम करीत असताना अचानक बिबट्याने शेतकºयावर पाठीमागून हल्ला केला. त्याचदरम्यान आजूबाजूच्या शेतात काम करणाºया शेतकºयांनी धाव घेतल्यामुळे बिबट्याने घाबरून नजीकच्या शेतात पोबारा केला. दरम्यान, जखमी शेतकºयाला प्रथमोपचारासाठी जवळच्या खासगी दवाखान्यात नेऊन नंतर अधिक उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गिरणारे गावातील शेतकरी दीपक गणपत पिंगळे आपल्या लहान मुलासोबत नाईकवाडी रोडवरील रानवस्तीतील नागटेंबी परिसरातील शेतात काम करीत असताना बिबट्या व त्याची दोन पिल्ले त्याच परिसरात दबा धरून बसलेले होते.