चालत्या मोटरसायकलवर बिबट्याचा हल्ला, बालिका जखमी; सिन्नर तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2022 11:51 PM2022-12-10T23:51:32+5:302022-12-10T23:52:12+5:30
वडिलांच्या प्रसंगवाधनाने मुलीचे प्राण वाचले.
नायगाव जि नाशिक (दत्ता दिघोळे)- सिन्नर तालुक्यातील सोनगिरी - नायगाव रस्त्यावर चालत्या मोटार सायकलर बिबट्याने चाल करून नऊ वर्षाच्या मुलीला जखमी केल्याची घटना शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान घडली. वडिलांच्या प्रसंगवाधनाने मुलीचे प्राण वाचले.या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे.
सोनगिरी गावातील राजेंद्र लहाणे हे मुलगी गौरी लहाने ( वय ९ वर्ष ) ही गौरी सोबत मोटारसायकलवर नायगावहुन बाजार करून सोनगिरीकडे जात होते.कडवा पाटाजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने लहाणे यांच्या मोटारसायकलवर हल्ला चढवून पाठीमागे बसलेल्या गौरीवर चाल केली.
मात्र बिबट्याचा अंदाज चुकून लहानग्या मुलीचा पाय तोंडात सापडला.अशा परस्थितीत वडील लहाणे यांनी मोटारसायकल सुरूच ठेवल्यामुळे या झटापटीत काही अंतर पुढे गेल्यामुळे बिबट्याचा अंदाज चुकला.त्यामूळे गौरीच्या पायाला खोलवर जखम झाली आहे.मात्र वडील राजेंद्र लहाणे यांनी दाखवलेल्या धर्यामुळेच मुलगी बिबट्याच्या तावडीतून सुटल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.जखमी गौरीवर नाशिकच्या शासकीय दवाखान्यात उपचार सुरू आहे.
नायगाव - सोनगिरी या रस्त्यावर बिबट्याने चालत्या मोटारसायकलवर हल्ला चढवत लहानग्या गौरीस गंभीर जखमी केले आहे.याच कठीण परस्थितीत ब्राम्णवाडे येथिल सामाजिक कार्यकर्ते अजित गिते हे रस्त्याने घरी जात होते.त्यांनी घटनेचे प्रसंगवाधन ओळखून जखमी मुलीला व वडिलांना नाशिक येथे हलविले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"