शेतकऱ्यासमोरच बिबट्याचा शेळीवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 00:32 IST2020-12-26T22:48:14+5:302020-12-27T00:32:02+5:30

सिन्नर: तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये पुन्हा बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. दुपारी ४ वाजताच्या सुमारास शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत बिबट्याने शेळीवर ...

Leopard attacks goat in front of farmers | शेतकऱ्यासमोरच बिबट्याचा शेळीवर हल्ला

शेतकऱ्यासमोरच बिबट्याचा शेळीवर हल्ला

ठळक मुद्देविंचुरीदळवी : नागरिकांमध्ये घबराट, वन विभागाने पिंजरा लावण्याची मागणी

सिन्नर: तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये पुन्हा बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. दुपारी ४ वाजताच्या सुमारास शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत बिबट्याने शेळीवर हल्ला करून ठार केले. त्यामुळे पशुपालक व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

दारणा नदीच्या किनारी वाकी परिसरात रघुनाथ फकिरा पवार शेळ्या चारण्यासाठी गेलेले होते. त्यांच्याबरोबर दोन लहान मुलेही होती. दुपारी चारच्या सुमारास शेळ्या चारून घरी परतण्याच्या तयारीत असताना गणपत दळवी यांच्या शेताच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक पवार यांच्या शेळीवर हल्ला केला. हा प्रकार पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला व बिबट्याच्या जबड्यातून शेळीची सुटका केली.

मात्र तोपर्यंत शेळी ठार झालेली होती. सोबत असलेल्या चिमुकल्यांवरच जर बिबट्याने हल्ला केला असता तर मोठा अनर्थ घडला असता, या कल्पनेने पवार यांचा थरकाप उडाला. शेळीपालन हेच त्यांचे एकमेव उत्पनाचे साधन असल्याने त्यातही बिबट्याची दशहत निर्माण झाल्यामुळे पशुपालक भीतीच्या सावटाखाली आहे. पवार यांचे जवळजवळ १५ हजारांचे नुकसान झाले आहे. त्यांना त्वरित वन विभागाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

गेल्या काही महिन्यात वारंवार बिबट्याचा हल्ला आणि दर्शन अशा घटनांनी परिसरात भीतीचे वातावरण पसलेले आहे. महिना-दीड महिन्यापूर्वी पिकांच्या राखणीसाठी शेतातील घरी झोपण्यासाठी गेलेल्या वृध्दावर बिबट्याने हल्ला करुन ठार केल्याची थरकाप उडविणारी घटना घडली होती. त्यानंतर परिसरातील द्राक्ष उत्पादकाच्या शेतात बिबट्या दडून बसला होता. वस्त्यांवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना घराबाहेर पडणाऱ्या लहान मुलांवर सातत्याने लक्ष ठेवावे लागत आहे.

बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी
घटनेनंतर वनपाल पी. के. आगळे, वनरक्षक के. डी. सदगीर घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. बिबट्या दिवसाढवळ्या दर्शन देत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. पाळीव प्राण्यांवरसुद्धा बिबट्या वारंवार हल्ले करत आहे. कधीकधी बिबट्या मानवी वस्तीकडेसुद्धा शेतक-यांना दिसतो. वन विभागाने त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: Leopard attacks goat in front of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.