आगासखिंड येथे बिबट्याचा दुचाकीवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:14 AM2021-03-14T04:14:29+5:302021-03-14T04:14:29+5:30

सिन्नर : तालुक्यातील आगासखिंड शिवारात येथे गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्याने दुचाकीवर हल्ला केला. यात बापलेक जखमी झाल्याची ...

Leopard attacks two-wheeler at Agaskhind | आगासखिंड येथे बिबट्याचा दुचाकीवर हल्ला

आगासखिंड येथे बिबट्याचा दुचाकीवर हल्ला

Next

सिन्नर : तालुक्यातील आगासखिंड शिवारात येथे गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्याने दुचाकीवर हल्ला केला. यात बापलेक जखमी झाल्याची घटना घडली. बिबट्याने दुचाकीवर हल्ला चढविण्याच्या या महिन्यातील ही चौथी घटना असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. आगासखिंड येथील सोनू बाळू गाडरे (६०) व त्यांचा मुलगा रमेश सोनू गाडरे (३५) हे दोघे रात्री साडेनऊच्या सुमारास समृद्धी महामार्गाकडून मोजाड वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून गणेश आरोटे यांच्या काकडीस पाणी देण्यासाठी दुचाकीने जात होते. कैलास गोडसे यांच्या घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दुचाकीवर झडप घातली व पाठीमागे बसलेल्या सोनू गाडरे यांचा डावा हात जबड्यात धरला. यावेळी रमेश गाडरे याचा तोल जाऊन दुचाकी खाली पडली. चवताळलेल्या बिबट्याने त्यांच्यावर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी रमेशने कुऱ्हाड उगारून बिबट्यास पिटाळून लावत वडिलांचा जीव वाचविला. यात रमेश गाडरे किरकोळ जखमी झाले. गणेश आरोटे यांनी जखमी गाडरे यांना उपचारासाठी नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात हलविले. या घटनेची वन विभागाने दखल घेतली असून, वन परिमंडळ अधिकारी पंडित आगळे यांनी या भागात लवकरच पिंजरा लावण्यात येणार असल्याची माहिती दिली.

--------------------

महिनाभरा पूर्वी आगासखिंड येथील संदीप पूंजा आरोटे हे कबड्डी स्पर्धा बघून आपल्या घरी दुचाकीने जात असताना, रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास बिबट्याने त्यांच्या ही दुचाकीवर हल्ला केला होता. यात संदीप आरोटे यांच्या हातावर गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यानंतर पंधरा दिवसातच तृप्ती रवींद्र तांबे व यश अशोक वाजे शाळकरी विद्यार्थ्यांच्या दुचाकीवर हल्ला झाला होता. पुन्हा काल बिबट्याने दुचाकीवर हल्ला केल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

----------------

सिन्नर तालुक्यातील आगासखिंड शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेला शेतकरी. (१३ सिन्नर १)

===Photopath===

130321\13nsk_18_13032021_13.jpg

===Caption===

१३ सिन्नर १

Web Title: Leopard attacks two-wheeler at Agaskhind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.