बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 01:08 AM2022-02-12T01:08:15+5:302022-02-12T01:08:36+5:30
वटार येथील सावतावाडी वस्तीत बिबट्याने गेल्या एक महिन्यापासून धुमाकूळ घातला असून गुरुवारी मध्यरात्री शिवारातील रमण नारायण खैरनार यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र दैव बलवत्तर म्हणून ते वाचले.
वटार : वटार येथील सावतावाडी वस्तीत बिबट्याने गेल्या एक महिन्यापासून धुमाकूळ घातला असून गुरुवारी मध्यरात्री शिवारातील रमण नारायण खैरनार यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र दैव बलवत्तर म्हणून ते वाचले.
गुरुवारी मध्यरात्री वटार शिवारातील गट नंबर १८ मधील रमण नारायण खैरनार यांच्यावर खाटेवर झोपेत असतांना हल्ला चढवला. मात्र त्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने पळ काढला. तरीपण बिबट्या तिथेच न थांबता पुन्हा रात्री दोन तीन पाणी देत असलेल्या शेतकऱ्यांना दर्शन देऊन बिबट्याने दहशत कायम ठेवली आहे. वनविभागाने पंचनामा करून घटनास्थळी पिंजरा लावण्याचे आश्वासन दिले.
--------------------
मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने माझ्यावर खाटेवर जोपेत असताना हल्ला केला. जाडी गोधडी असल्यामुळे व आरडाओरड केल्यामुळे बिबट्याने पळ काढला. आज माझ्यावर हे संकट आले, उद्या कोणावरही येऊ शकते त्यासाठी वनविभागाने तातडीच्या उपाययोजना कराव्यात.
रमण खैरनार,शेतकरी, वटार
----------------------
रात्रीच्या वेळेस शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांनी जागरूक राहिले पाहिजे. फटाके फोडणे, जाळ करणे असे काही केले तर बिबट्या जवळ येणार नाही व शेतीचे पाणी देण्याचे कामही सुरळीत चालेल, वनविभागामार्फत लवकरात लवकर पिंजरा लावण्यात येईल.
प्रशांत खैरनार, रेंजर ऑफिसर, सटाणा