चिंचोलीत बिबट्या पिंजऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 08:56 PM2020-07-22T20:56:01+5:302020-07-23T01:02:41+5:30
नायगाव : सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथे मुक्त संचार करणारा बिबट्या पिंजºयात जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र नायगाव खोºयातील तिन्ही बिबटे अजूनही शिवारात फिरत असल्याने पशुपालकांबरोबर शेतकरी दहशतीखालीच वावर आहेत.
नायगाव : सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथे मुक्त संचार करणारा बिबट्या पिंजºयात जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र नायगाव खोºयातील तिन्ही बिबटे अजूनही शिवारात फिरत असल्याने पशुपालकांबरोबर शेतकरी दहशतीखालीच वावर आहेत.
गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून चिंचोली परिसरात बिबटे मुक्तपणे शेत-शिवारात फिरत असल्यामुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्यांना भरदिवसा शेताशेतात दर्शन देणाºया तीन बिबट्यांनी चिंचोली परिसरातील भटक्या कुत्र्यांना भक्ष्य बनविले आहे.
मोकळ्या वातावरणात फिरणाºया बिबट्यांनी चांगलीच दहशत निर्माण केली होती. कुठलीही अनुचित घटना घडण्याआधी या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पोलीसपाटील मोहन सांगळे यांनी वनविभागाकडे केली होती. दोन दिवसांपूर्वी महादू लहानू सानप या शेतकºयाच्या गट नंबर ३२ मध्ये पिंजरा लावण्यात आला होता. मंगळवारी रात्री तीनपैकी एक बिबट्या पिंजºयात अडकला. मात्र अजूनही दोन बिबटे परिसरात वावरत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपासून नायगाव खोºयात मुक्त फिरणाºया तीन बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला आहे. मात्र पिंजºयाभोवती फिरूनही हे बिबटे पिंजºयात अडकत नसल्यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.
-----------------
नायगाव परिसरातील प्रत्येक गावात गेल्या महिनाभरापासून बिबट्यांचा संचार वाढला आहे. जेजूकर मळ्यात पंधरा दिवसांपासून दिवसंभर फिरणाºया बिबट्यांनी नायगाव-वडझिरे रस्त्यावर राहणारे त्र्यंबक सांगळे यांच्या शिवाराकडे आपला मोर्चा वळविला आहे. वनविभागाने या ठिकाणीही पिंजरा लावून बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा.
- भाऊसाहेब लोहकरे, माजी सरपंच, नायगाव