देशवंडी येथे  बिबट्या पिंजऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 12:37 AM2020-10-17T00:37:07+5:302020-10-17T00:38:22+5:30

सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे गुरुवारी (दि. १५ ) बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागास यश आले आहे. गेल्या आठ दिवसांपासून दगडे मळ्यात पिंजरा लावण्यात आला होता. मळ्यातील डोमाडे व सानप वस्तीवर गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा संचार वाढला होता.

In a leopard cage at Deshwandi | देशवंडी येथे  बिबट्या पिंजऱ्यात

देशवंडी येथे  बिबट्या पिंजऱ्यात

googlenewsNext

नायगाव : सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे गुरुवारी (दि. १५ ) बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागास यश आले आहे. गेल्या आठ दिवसांपासून दगडे मळ्यात पिंजरा लावण्यात आला होता. मळ्यातील डोमाडे व सानप वस्तीवर गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा संचार वाढला होता. येथूनच जवळ असलेल्या मेंगाळ वस्तीवरील बन्सी मेंगाळ यांच्या शेळ्यांच्या कळपावर हल्ला चढवून एका शेळीला ठार केल्याची 
घटना घडली होती. तेव्हापासून या संपूर्ण खोऱ्यातील पशुपालकांसह वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली होती. 
दरम्यान, दगडे वस्तीवरील शेतकऱ्यांच्या मागणीमुळे या परिसरात वनविभागाने पिंजरा लावला होता. गुरुवारी पहाटेच्या सुमारास सावजाच्या नादात बिबट्या पिंजऱ्यात अडकला. पिंजऱ्यात बंदिस्त झालेल्या बिबट्याच्या डरकाळ्याने देशवंडी खोरा दणाणून गेला होता. 
बिबट्या अडकल्याची बातमी  गावात पसरताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. वनविभागाला माहिती दिल्यानंतर शुक्रवारी सकाळी वनविभागाने बिबट्याची मोहदरी येथील उद्यानात रवानगी केली. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यामुळे दगडे मळ्यातील शेतकरी व पशुपालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. 

Web Title: In a leopard cage at Deshwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.