तारुखेडले येथे बिबट्या पिंजऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 10:40 PM2020-12-23T22:40:32+5:302020-12-24T01:05:11+5:30
निफाड : तालुक्यातील तारुखेडले येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. हा मादी बिबट्या चार वर्षाचा आहे.
निफाड : तालुक्यातील तारुखेडले येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. हा मादी बिबट्या चार वर्षाचा आहे.
तारुखेडले येथील भाऊसाहेब रघुनाथ सांगळे यांच्या शेतपरिसरात बिबट्याने काही कुत्रे फस्त केल्याने या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. वन विभागाने सांगळे यांच्या शेतात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता. बुधवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. त्यानंतर मनमाडचे वनपाल भगवान जाधव , वनरक्षक सुनील महाले,वनसेवक भय्या शैख , शिंदे आदींच्या पथकाने पिंजऱ्यात जेरबंद केलेल्या बिबट्याला निफाड येथील वन विभागाच्या रोपवाटिका केंद्रात आणले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ चांदोरे यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली.