विंचूरीदळवीत बिबट्याचा संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 05:56 PM2019-06-26T17:56:05+5:302019-06-26T17:56:18+5:30

सिन्नर : तालुक्यातील भगूर-पांढुर्ली रस्त्यावरील दत्तू विठोबा दळवी यांच्या पेरूच्या बागेत गेल्या तीन-चार दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार आढळून येत आहे. या प्रकरणामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

Leopard circulation | विंचूरीदळवीत बिबट्याचा संचार

विंचूरीदळवीत बिबट्याचा संचार

Next

सिन्नर : तालुक्यातील भगूर-पांढुर्ली रस्त्यावरील दत्तू विठोबा दळवी यांच्या पेरूच्या बागेत गेल्या तीन-चार दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार आढळून येत आहे. या प्रकरणामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याचा सलगपणे दळवी यांच्या शेतावर वावर आहे. परिसरातील तीन-चार भटक्या कुत्र्यांचा या बिबट्याने फडशा पाडला आहे. बिबट्याच्या भीतीने मजूर देखील बागेत अथवा आजूबाजूच्या शेतामध्ये काम करायला धजावत नसून त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. पेरूची बाग वर्दळीची असून रस्त्याने पायी अथवा दुचाकीवरून जाणारे जीव मुठीत धरूनच मार्गक्रमण करत आहेत. पाळीव प्राणी अथवा मानसांना नुकसान पोहोचण्यापूर्वी वनविभागाने या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावाला अशी मागणी परिसरातून होत आहे.

Web Title: Leopard circulation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ