आमोदे परिसरात बिबट्याचा संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 01:19 AM2017-08-26T01:19:10+5:302017-08-26T01:19:15+5:30
नांदगाव तालुक्यातील आमोदे, बोराळे, सायगाव तसेच गिरणा नदीच्या काठावरच्या गावांच्या परिसरात गेल्या आठवड्यापासून बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला असून, शेतकरी भयभीत झाले आहेत. त्या अनुषंगाने वनविभागाच्या कर्मचाºयांनी दोन दिवस शोध घेतला असून आज सकाळी त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.
साकोरा : नांदगाव तालुक्यातील आमोदे, बोराळे, सायगाव तसेच गिरणा नदीच्या काठावरच्या गावांच्या परिसरात गेल्या आठवड्यापासून बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला असून, शेतकरी भयभीत झाले आहेत. त्या अनुषंगाने वनविभागाच्या कर्मचाºयांनी दोन दिवस शोध घेतला असून आज सकाळी त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे. बुधवारी बोराळे येथून कापसाची गाडी घेऊन जानाºया मोहसीन नावाच्या गाडी चालकाने बोराळे शिवारातील शिवबंधाºयाजवळील कपाशिच्या शेतात बिबट्या पाहिल्याची बातमीआमोद्याचे सरपंच विठ्ठल पगार, महेंद्र पगार यांना दिली. त्यानंतर शिवसेनेचे विभाग प्रमुख आप्पासाहेब पगार यांनी ही माहिती वनविभागाला कळविली. त्यानंतर सायंकाळी पुन्हा बिरोळ्याच्या शेतात जितेंद्र सोळुंके यांना फवारणी करतांना पुन्हा दिसल्याने त्यांची त-त, फ-फ झाली. त्यांनी बिरोळ्याचे उपसरपंच राजेंद्र पवार यांना माहिती देताच त्यांनी देखील वनविभागाला माहीती दिल्याने बिबट्या असल्याची खात्री झाली. वनविभागाने रात्री उशिरापर्यंत हा परिसर पिंजून काढला. काही ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. बिबट्या चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवीच्या जंगलातून आला असल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवारी सकाळी वनविभागाने त्याची त्वरीत दखल घेऊन नासिक विभागात माहिती देऊन पिंजरा बोलवून तो लावण्यात आला आहे. याबाबत परिसरातील गावकºयांनी बिबट्या जेरबंद होईपर्यंत सतर्क रहावे असेआवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.