धारणगाव वीर येथे बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 06:09 PM2021-02-24T18:09:36+5:302021-02-24T18:10:45+5:30

खेडलेझुंगे : खेडलेझुंगे, कोळगांव, सारोळे थडी, धारणगाव परिसरामध्ये बिबट्यांचा वावर आहे. दरम्यान, मंगळवारी परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी सकाळी एक बिबट्या जेरबंद झाला. या भागात बिबट्यांचे वास्तव्य वाढले असून, नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

Leopard confiscated at Dharangaon Veer | धारणगाव वीर येथे बिबट्या जेरबंद

धारणगाव वीर येथे बिबट्या जेरबंद

googlenewsNext
ठळक मुद्देवनखात्याला यश : परिसरात बिबट्यांची दहशत

खेडलेझुंगे : खेडलेझुंगे, कोळगांव, सारोळे थडी, धारणगाव परिसरामध्ये बिबट्यांचा वावर आहे. दरम्यान, मंगळवारी परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी सकाळी एक बिबट्या जेरबंद झाला. या भागात बिबट्यांचे वास्तव्य वाढले असून, नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

येथील अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा बिबट्याने पाडलेला आहे. सद्या सुरू असलेल्या ऊस तोडणीमुळे आणि अवकाळी व वातावरणातील सततच्या बदलामुळे बिबट्यांचे आश्रय घेणे अवघड होत चालले असल्यामुळे बिबट्यांनी त्यांचा मोर्चा गावांकडे वळविलेला आहे. परिसरामध्ये नेमक्या किती बिबट्यांचा वावर आहे ? हे सांगता येणार नाही. परंतु, परिसरामध्ये बिबट्यांचा वावर वाढला असल्याचे दिसुन येत आहे.

गेल्या आठवडाभरापासून ह्या परिसरात बिबट्यांची दहशत वाढलेली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर, तसेच व्यवसायावर त्याचा परिणाम होत असून, सर्वत्र भीतीचे सावट पसरलेले आहे. त्यातच वीज वितरण कंपनीकडून शेतीसाठी रात्रीचा वीजपुरवठा होतो. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी रात्री-अपरात्री जावे लागते. त्यातच परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांच्या जिवावर बेतण्यासारखे आहे.
या संदर्भात परिसरातील नागरिकांनी ओरड करताच वनखात्याने परिसरात मंगळवारी (दि. २३) पिंजरा लावला असता बुधवारी (दि. २४) सकाळी एक बिबट्या या पिंजऱ्यात अडकला.

बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अशक्य होत आहे. अजूनही परिसरामध्ये किती बिबटे आहेत याची माहिती नसल्याने नागरिकांमध्ये याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच वीजपुरठा दिवसाचा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पिंजऱ्यात अडकलेला बिबट्यास वन विभागाचे अधिकारी महाले व शेख ह्यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल गंभीरे, राहुल गंभीरे, महेश गंभीरे, संजय गंभीरे, अजय गंभीरे, मन्सूर शेख, ॠषीकेश गंभीरे, स्वप्निल गंभीरे, आदी ग्रामस्थांच्या सहकार्याने वनविभागाकडे पाठविण्यात आले. (२४ खेडलझुंगे, १, २)

Web Title: Leopard confiscated at Dharangaon Veer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.