सिन्नर तालुक्यात बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 05:11 PM2021-05-21T17:11:35+5:302021-05-21T17:11:50+5:30

सिन्नर : तालुक्यातील शहा येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. (दि. २१) पहाटे उघडकीस आली.

Leopard confiscated in Sinnar taluka | सिन्नर तालुक्यात बिबट्या जेरबंद

सिन्नर तालुक्यात बिबट्या जेरबंद

Next

सिन्नर : तालुक्यातील शहा येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. (दि. २१) पहाटे उघडकीस आली. नर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला असला तरी त्याच्यासोबत असलेली मादी व बछड्याचा मुक्त संचार सुरु असल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत कायम आहे.
गेल्या चार दिवसांपासून शहा शिवारात बिबट्याच्या जोडीचे बछड्यासह दर्शन होत होते. बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास सोनवणे मळ्यातील रामा सोनवणे हे मळ्यातून गावात दूध घालण्यासाठी येत असतांना बिबट्याने दुचाकीचा पाठलाग केला होता. रामा सोनवणे यांनी जवळील वस्तीवर सहारा घेतल्याने बिबट्या माघारी गेला होता. या घटनेची माहिती सरपंच शुभांगी जाधव व त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संभाजी जाधव यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने वनविभागासोबत संपर्क साधून या भागात पिंजरा लावण्याची मागणी केली होती.
त्यानंतर गुरुवारी सकाळी शहा-कोळगाव रस्त्यावर सोनवणे मळ्यातील ज्ञानेश्वर सोपान राहाणे यांच्या शेतात पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात कोंबड्या टाकण्यात आल्या होत्या. गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास नर बिबट्या या पिंजऱ्यात अलगत अडकला. त्यानंतर मादी व बछड्या या भागात संचार करीत होते. घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रीतेश सरोदे, वनरक्षक के. आर. इरकर, वनसेवक नारायण वैद्य, मधुकर शिंदे यांनी घटनास्थळी येऊन रात्री ११ वाजता बिबट्याची मोहदरी वनउद्यानात रवानगी केली होती.
---------------------------
शहा -कोळगाव रस्त्यावर सोनवणे मळ्यात नर बिबट्या जेरबंद झाला असला तरी मादी व बछड्याचा मुक्त संचार सुरु आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी कामावर जाण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. वनविभागाने या परिसरात पुन्हा पिंजरा लावून मादी व बछडा जेरबंद करण्याची मागणी नवनाथ सोनवणे, संभाजी जाधव यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Leopard confiscated in Sinnar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक