बिबट्या मृत्यूमुखी

By Admin | Published: May 19, 2015 02:04 AM2015-05-19T02:04:22+5:302015-05-19T02:04:51+5:30

बिबट्या मृत्यूमुखी

Leopard died | बिबट्या मृत्यूमुखी

बिबट्या मृत्यूमुखी

googlenewsNext

नाशिकरोड/देवळाली कॅम्प : पहाटेच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या पोल नं. ६०/६२,१७७ किमी अंतरावर भगूर लहवित रोडवर असणाऱ्या रेल्वे लाइनवर प्रवासी रेल्वे गाडीला धक्का लागून अंदाजे सहा वर्षांचा बिबट्या मृत्यूमुखी पडला.
उन्हाळ्यामुळे पाण्याची टंचाई जाणवत असल्याने गत दोन महिन्यांपासून देवळालीच्या बार्न्स स्कूल परिसरात लष्कराच्या हद्दीतील जंगलात बिबट्यांचा वावर वाढला असल्याची माहिती मिळाली होती. १५ मे रोजी याच बिबट्याने चौधरी यांच्या मळ्यात शेळी व डुक्कर फस्त केले होते. त्यांनी आरडओरडा करताच बिबट्याने परिसरातून पळ काढला. काल मध्यरात्रीच्या सुमारास पाण्याच्या शोधार्थ बिबट्याने दारणाकाठी गेला होता. तिकडून परतत असताना भगूर लहवित रस्त्यावर राहत असलेल्या डोंगरे यांच्या मळ्या लगत रेल्वे लाइन ओलांडून जात असताना पहाटेच्या वेळी बिबट्याला रेल्वेचा अंदाज न आल्याने त्याच्या चेहऱ्यावर व कपाळावर गंभीर जखम होऊन जागीच मृत पावला. घटनेची माहिती वनविभागाला मिळताच सहायक वनसंरक्षक प्रदीप भामरे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार, वनपाल एम. एस. गोसावी यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याची पाहणी करत ताब्यात घेतले. (वार्ताहर)

Web Title: Leopard died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.