बिबट्याने पाडला वासराचा फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 12:07 AM2021-07-08T00:07:14+5:302021-07-08T00:07:38+5:30

मेशी : देवळा तालुक्यातील पूर्व भागातील मेशीसह डोंगरगाव परिसरात बिबट्याची दहशत कायम असून मंगळवारी (दि.६) पुन्हा डोंगरगाव येथील शेतकरी दादाजी सावंत यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या गाईच्या वासराचा फडशा पाडला आहे.

The leopard dropped the calf | बिबट्याने पाडला वासराचा फडशा

बिबट्याने पाडला वासराचा फडशा

Next
ठळक मुद्देमहिन्यातील तिसरी घटना : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

मेशी : देवळा तालुक्यातील पूर्व भागातील मेशीसह डोंगरगाव परिसरात बिबट्याची दहशत कायम असून मंगळवारी (दि.६) पुन्हा डोंगरगाव येथील शेतकरी दादाजी सावंत यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या गाईच्या वासराचा फडशा पाडला आहे.

महिन्यातील ही तिसरी घटना आहे. मागील पंधरवड्यात डोंगरगाव येथील जखमी बिबट्या सापडला होता. मेशी, डोंगरगाव परिसराला सुमारे बाराशे हेक्टरचे विस्तीर्ण जंगल आहे. यामुळेच या परिसरात नेहमी बिबट्यांचा वावर असतो. अनेक वेळा गुरे, शेळ्या, मेंढ्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारले आहे.

सोमवारी (दि.५) रात्री मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून वासरू ठार करूनच जवळचे झुडपात फरपटत ओढत नेले. सकाळी शेतकरी उठल्यानंतर गोठ्यात वासरू न दिसता रक्ताचे थारोळे दिसले तसेच फरपटत ओढत नेल्याच्या खुणा व बिबट्याच्या पायाचे ठसे उमटलेले दिसले. ठशांच्या मागावरून तपास करत काही अंतरावर झुडपात शरीराचे लचके तोडलेले वासरू निदर्शनास पडले. त्यामुळे बिबट्याचा अजूनही परिसरात वावर असल्याची खात्री झाली.
डोंगरगाव वनसमितीचे अध्यक्ष लालजी सावंत, सरपंच दयाराम सावंत, पोलीस पाटील प्रल्हाद केदारे यांनी वनविभागाला माहिती कळविली आहे. विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. सदर घटनेमुळे शेतात राहणारे शेतकरी भयभीत झाले आहे त्यामुळे वनविभागाने याची दखल घेण्याची मागणी केली जात आहे.

(०७ मेशी)
बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेले वासरु.

Web Title: The leopard dropped the calf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.