VIDEO: नाशकात बिबट्याला पकडण्याचा थरार सुरू; बिबट्याच्या हल्ल्यात वन क्षेत्रपाल जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 11:24 AM2021-04-18T11:24:58+5:302021-04-18T11:27:53+5:30
नरसिंह नगर भागात शिरला बिबट्या; वनखात्याकडून बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू
नाशिक- शहरातील नरसिंह नगर येथे नागरी वस्तीत आज सकाळी बिबट्या शिरल्याने धावपळ उडाली आहे वन खात्याचे कर्मचारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी घटनास्थळी आले असले तरी बिबट्या च्या मागे त्यांची धावपळ सुरू आहे. बिबट्याला पकडण्याच्या प्रयत्नात वन क्षेत्रपाल विवेक भदाणे यांना बिबट्याने पंजा मारल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांनी बिबट्याला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना अपयश आले.
दरम्यान, अक्षरधाम सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर सध्या बिबट्या असून त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यातसाठी वनखात्याची कसरत सुरू आहे.
नाशिक शहरातील नरसिंह नगर - आनंदवली भागात यापूर्वीसुद्धा दोन ते तीन वेळेस बिबट्याचे दर्शन झाले होते. आला होता आज सकाळी अनेक नागरिकांना मॉर्निंग वॉकला जाताना खासदार भारती पवार यांच्या घराजवळ बिबट्या आढळला त्यामुळे पोलिसांनी वनखात्याला कळविण्यात आले . ही माहिती कळताच घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली.
नाशिक- गंगापूर रोड परिसरात पुन्हा बिबट्याचं दर्शन; खासदार भारती पवार यांच्या बंगल्याच्या आवारात बिबट्याचा वावर; बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/J25BeppJgN
— Lokmat (@MiLOKMAT) April 18, 2021
वनखात्याचे कर्मचारी आणि पोलिस हे बिबट्याला पकडून असताना नागरिकांच्या गर्दीमुळे त्याला पकडण्यात अडचणी येत होत्या दरम्यान सध्या अक्षर धाम या सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर बिबट्या असल्याचे वन कर्मचाऱ्यांनी सांगितले या बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी वन खात्याचे कर्मचारी इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करीत आहे तथापि अद्यापही यश आले नाही घटनास्थळी प्रचंड गर्दी असल्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन वनखात्याच्या वतीने करण्यात आले आहे.