बिबट्याचा मुक्तसंचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 10:43 PM2017-09-17T22:43:44+5:302017-09-18T00:07:59+5:30
दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील सुदाम पंढरीनाथ उफाडे यांच्या वस्तीवरील गायीवर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले असून, यापूर्वीदेखील उफाडे यांच्या शेळी व घोड्याच्या शिंगरावर बिबट्याने हल्ला करून जिवे मारले आहे. बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील सुदाम पंढरीनाथ उफाडे यांच्या वस्तीवरील गायीवर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले असून, यापूर्वीदेखील उफाडे यांच्या शेळी व घोड्याच्या शिंगरावर बिबट्याने हल्ला करून जिवे मारले आहे. बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.
तालुक्यातील वरखेडा, परमोरी, राजापूर, मातेरेवाडी, चिंचखेड, जोपूळ, लोखंडेवाडी, अवनखेड, नळवाडपाडा, नळवाडी, वागळूद, देहेगाव, लखमापूर, म्हेळूस्के, करंजवण, ओझे आदी गावांतील शिवार परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त संचार होत असून, वरखेडा येथे पुन्हा बिबट्याने सुभाष उफाडे यांच्या वस्तीवरील गायीवर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. आरडाओरड केल्याने बिबट्या पळाला असला तरी दहशत कायम आहे. तालुक्यातील वरखेडा,आंबेवणी, परमोरी, राजापूर, अवनखेड, लखमापूर, करंजवण व शिवनई (आंबेहिल) या गावांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार होत असून, कुत्रे, शेळ्या व लहान वासरे यांच्यावर बिबट्या हल्ले करीत असल्याने व भरदिवसा मानवी वसाहतीत बिबट्याचा मुक्तसंचार वाढल्याने नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली राहात आहे. भयभीत झालेल्या नागरिकांच्या मागणीची दखल घेत दिंडोरीचे वनक्षेपाल सुनील वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल दळवी, एस. जी. मोगरे, एस. पी. चौरे, रमेश झुरडे कर्मचारी वर्ग उपस्थित होता.