बिबट्या गोंदे दुमाल्यात बिबट्या पिंज-यात जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 01:46 PM2019-01-28T13:46:16+5:302019-01-28T13:46:50+5:30
नांदूरवैद्य: इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील तानाजी नाठे यांच्या मळ्यामध्ये अनेक दिवसांपासून येथील शेतक-यांच्या निदर्शनास येत असलेला बिबट्या अखेर सोमवारी(दि.२८) पहाटेच्या सुमारास वनविभागाने लावलेल्या पिज-यात अखेर जेरबंद झाला.

नाठे वस्तीवर पिंज-यात पकडण्याची बातमी परिसरात वा-याच्या वेगाने पसरताच येथील औद्योगिक वसाहतीतील कर्मचारी तसेच परिसरातील शेतकº्यांना या बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली.सदर बिबट्या राञी अपराञी जाधव वस्ती, मुकले धरण परिसर, तसेच कै.कचरु नाना नाठे यांच्या मळ्यामध्ये सतत निदर्शनास येत होता. या वस्तीवर अनेक शेतकº्यांच्या म्हशी, गायी, शेळ्या, मेंढ्या तसेच लहान मुले यांना या बिबट्यापासून धोका असल्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.परंतू आज हा बिबट्या अखेर पिंज-यात जेरबंद झाल्याचे समजताच येथील शेतकº्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तरीही अजून दोन बिबट्याचे बछडे या परिसरात असल्यामुळे भीतीचे वातावरण कायम आहे.यानंतर वनविभागाचे कर्मचारी गाडी बोलावून पिंज-यात अडकलेल्या बिबट्याला घेऊन गेले.
--