कुरु डगाव येथे बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 05:49 PM2018-09-01T17:49:21+5:302018-09-01T17:49:38+5:30
निफाड : तालुक्यातील कुरु डगाव येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
निफाड : तालुक्यातील कुरु डगाव येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
तालुक्यातील कुरु डगाव येथे येथे बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने येवला वनविभागाने कुरु डगाव शिवारात राहणारे प्रकाश गोपीनाथ मोगल यांच्या गट नंबर ७८ मध्ये बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता. दिनांक ३१ आॅगस्टच्या रात्री या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. सदरची घटना मोगल यांनी येवला वनविभाग वनविभागाला कळवल्यानंतर येवला वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली विंचुरचे वनरक्षक विजय टेकणर, वनसेवक भय्या शेख , वनमजूर भारत माळी , पिंटू नेहरे , विजय माळी, रामचंद्र भोरकडे यांच्या पथकाने मोगल यांच्या शेतात तातडीने भेट देऊन या बिबट्याला निफाड येथील वनविभागाच्या रोपवाटिका केंद्रात आणले याठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ चांदोरे यांनी या बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली त्यानंतर या बिबटयÞाला नैसिर्गक अधिवासात सोडण्यासाठी वनविभागाने पुढील कार्यवाही केली हा मादी बिबट्या दीड वर्षांचा असून या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती हा बिबट्या जेरबंद केल्याने कुरु डगाव व कोठुरे येथील शेतकºयांनी समाधान व्यक्त केले.