बेलगाव कुºहे येथील पोल्ट्रीतून बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 11:45 PM2019-04-01T23:45:31+5:302019-04-01T23:47:10+5:30

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुºहे येथील लष्करी हद्दीजवळ असलेल्या माजी सरपंच संजय गुळवे यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये अडकलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. चार तासांच्या रेस्क्यूनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आल्यानंतर वनकर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Leopard from Jericho at Belgaum Ku Pu | बेलगाव कुºहे येथील पोल्ट्रीतून बिबट्या जेरबंद

बेलगाव कुºहे येथील पोल्ट्री फार्ममध्ये अडकलेल्या बिबट्यास घेऊन जाताना वनविभागाचे अधिकारी.

googlenewsNext
ठळक मुद्देरेस्क्यू आॅपरेशन : चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर वनविभागाला यश

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुºहे येथील लष्करी हद्दीजवळ असलेल्या माजी सरपंच संजय गुळवे यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये अडकलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. चार तासांच्या रेस्क्यूनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आल्यानंतर वनकर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
बेलगाव कुºहेचे माजी सरपंच संजय गुळवे यांच्या पोल्ट्री फार्मच्या छतावर रविवारी सकाळी अकरा वाजेदरम्यान बिबट्या आढळून आला. येथील कामगारांनी बिबट्यास बघितले व ते घाबरून पळू लागले. दरम्यान बिबट्याच्या वजनाने पोल्ट्रीच्या छतावरील एक सिमेंट पत्रा फुटून बिबट्या शेडमध्ये पडला.
पोल्ट्रीत बिबट्या असल्याची बातमी क्षणार्धात पसिरात तसेच गावात पोहोचली आणि बघ्यांनी बिबट्या पाहण्यासाठी गर्दी केली. गर्दी पाहून बिथरलेला बिबट्या पोल्ट्रीतून बाहेर पडण्यासाठी पळू लागला. बघ्यांच्या गर्दीवर डरकाळ्या फोडत धावत जाऊन पोल्ट्रीच्या संरक्षक जाळ्यांना धडक देऊ लागला. या धडकेत त्याच्या तोंडाला जखम झाली व रक्तही निघू लागले. अर्ध्या तासाच्या या थरारनाट्यानंतर दमलेला बिबट्या घाबरून बाजूला असलेल्या प्लॅस्टिक कागदाआड जाऊन बसला. या घटनेत शेडमध्ये असलेले हजार ते पंधराशे पक्षी घाबरून मृत्युमुखी पडले. यात गुळवे यांचे किमान
पंधरा ते वीस हजारांचे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती बेलगावचे सरपंच प्रा. नंदराज गुळवे यांनी वनविभागाला कळवली. वनविभागाचे वाडीवºहे बिटाचे वनपरिमंडल अधिकारी ओंकार देशपांडे व त्यांची पथक घटनास्थळी हजर झाले. त्यांनी परिस्थिती पाहून पिंजऱ्याची व्यवस्था केली. तसेच नाशिकच्या रेस्क्यू टीमला पाचारण केले. इगतपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश डोमसे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक वनविभागाचे वनाधिकारी एस. पी. थोरात, वनपाल पी. के. डांगे, वनपाल बी. जे. राव, वनरक्षक पी. साबळे, वाहक मज्जू शेख यांच्या चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर रेस्क्यू आॅपरेशन राबवून बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.
यावेळी सरपंच राजाभाऊ गुळवे, नंदराज गुळवे, संतोष गुळवे, अनिल गुळवे, उपसरपंच कोंडाजी गुळवे आदी नागरिक उपस्थित होते. गावातील पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्या शिरल्याची बातमी कळताच घटनास्थळी धाव घेऊन वनविभागाला दूरध्वनीवरून माहिती दिली. वन अधिकाºयानीदेखील तातडीने दाखल होत बिबट्याला रेस्क्यू आॅपरेशनद्वारे जेरबंद केले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
- नंदराज गुळवे, सरपंच, बेलगाव कुºहे

Web Title: Leopard from Jericho at Belgaum Ku Pu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.