बिबट्याने पाडला बैलाचा फडशा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 10:27 PM2020-09-03T22:27:57+5:302020-09-04T00:43:22+5:30
त्र्यंबकेश्वर : बुधवारी(दि.२) मौजे खरवळ येथे सोमा काशीराम मौळे यांच्या शेतात पहाटेच्या सुमारास बिबट्याने आंब्याच्या वाडीत बैल ठार केला. त्याला सोडवण्यासाठी गेले असता तो रमेश मौळे यांच्यावर धाऊन गेल्याने त्यांना पळ काढावा लागला. या घटनेनंतर बैलाचा पंचनामा करण्यात आला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरवळ परिसरात या घटनेमुळे बिबट्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी उपसरपंच गोकुळ गारे व परिसरातील नागरिकांनी केली आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : बुधवारी(दि.२) मौजे खरवळ येथे सोमा काशीराम मौळे यांच्या शेतात पहाटेच्या सुमारास बिबट्याने आंब्याच्या वाडीत बैल ठार केला. त्याला सोडवण्यासाठी गेले असता तो रमेश मौळे यांच्यावर धाऊन गेल्याने त्यांना पळ काढावा लागला. या घटनेनंतर बैलाचा पंचनामा करण्यात आला.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरवळ परिसरात या घटनेमुळे बिबट्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी उपसरपंच गोकुळ गारे व परिसरातील नागरिकांनी केली आहे.
वर्षभरापासुन संपूर्ण त्र्यंबकेश्वर तालुक्यात किमान सात आठ बिबट्यांचा वावर तालुक्यातील वावीहर्ष परिसरापासुन ते गडदवणे परिसरापर्यंत बिबटे फिरत असुन ब्रम्हगिरीच्या भातखळ्यात बिबट्याने गाय ठार केली होती. यापुर्वी येथील ब्रम्हगिरीच्या रस्त्यावर मध्यभागी असलेल्या मुक्तादेवीच्या मंदीराजवळ रात्री बिबट्याने एक गाय ठार केली होती.
दरम्यान त्र्यंबकेश्वर तालुक्यात व परिसरात बिबटे, तरस, मोर,ससे, रानडुकरे आदी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यात बिबटे जनावरांचा फडशा पाडत शेतकऱ्यांचे नुकसान करत आहेत. बेझे, चाकोरे, वाघेरा, वळणगावचे पाडे आदी ठिकाणी घटनाघडल्या आहेत. चार महिन्यां पुर्वी नाशिक त्र्यंबक रस्त्यावर एक बिबट्या अज्ञात वाहन धडकेने बिबट्या ठार झाला होता.
चौकट...
तालुक्यात वन्य प्राण्यांसाठी जंगलात वनतळे जलाशय राखुन ठेवले आहेत. जंगलात नजीकच्या गावातील मोकाट जनावरे चरण्यासाठी गेली की अशा बिबटे व रान डुकरांकडून ते शिकार होतात. जंगल परिसर वन्य प्राण्यांसाठी संरक्षित असते. यास्तव मालकांनी जनावरांना मोकाट न सोडता गावातच चरण्यास सोडावे असे वन परिक्षेत्र अधिकारी कैलास अहिरे यांनी सांगितले.