पिंजऱ्यावर धडका देत बिबट्याने गमावले सुळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 12:34 AM2020-12-28T00:34:49+5:302020-12-28T00:36:15+5:30

इगतपुरीत मानवी हल्ले करत बालिकांना ठार करणारा बिबट्या आता कायमस्वरूपी पिंजऱ्यात जेरबंद राहणार आहे. कारण हा बिबट्या पिंजऱ्याच्या जाळीवर जोरजोराने धडका देऊन स्वत:चे सुळकेही गमावून बसला आहे.

The leopard lost its cone by hitting the cage | पिंजऱ्यावर धडका देत बिबट्याने गमावले सुळके

पिंजऱ्यावर धडका देत बिबट्याने गमावले सुळके

googlenewsNext
ठळक मुद्देआयुष्यभराची कैद नशिबीपुनर्वसन केंद्रात हलविण्याबाबत उदासीनता

नाशिक : इगतपुरीत मानवी हल्ले करत बालिकांना ठार करणारा बिबट्या आता कायमस्वरूपी पिंजऱ्यात जेरबंद राहणार आहे. कारण हा बिबट्या पिंजऱ्याच्या जाळीवर जोरजोराने धडका देऊन स्वत:चे सुळकेही गमावून बसला आहे. पिंजऱ्यात कैद भोगताना हा बिबट्या अत्यंत आक्रमक व तणावाखाली आला आहे. त्यामुळे या बिबट्याला लवकरात लवकर बोरीवली किंवा जुन्नर येथील बिबट्या पुनर्वसन केंद्रात हलविणे गरजेचे आहे. मात्र, याबाबत पश्चिम वनविभाग उदासीन असल्याचे दिसते.
इगतपुरी वनपरीक्षेत्रातील पिंपळगाव मोर गावाच्या शिवारात १ डिसेंबर रोजी पहाटे पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्या हा सुमारे साडेचार वर्षे वयाचा असून, हा बिबट्या जेरबंद झाल्यापासून अत्यंत आक्रमक आहे. जवळपास मागील एक महिन्यापासून लहानशा ट्रॅप पिंजऱ्यात बिबट्या कैदेत असल्याने तो अधिकच चिडखोर बनला आहे. या बिबबट्याने पिंजऱ्याच्या लोखंडी जाळीवर स्वत:चे डोके आदळून कपाळही काही दिवसांपूर्वी फोडून घेतले 
होते. 
उपचारानंतर ती जखम भरून आलीस असली, तरी बिबट्याने मात्र त्याचे दात या धडकांमध्ये कायमचे गमावले आहेत. एकूणच या लहानशा पिंजऱ्यात अडकल्यापासून बिबट्याची अधिकच वाताहत होताना दिसत आहे. या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करणे आता कदापि शक्य नाही. किंबहुना, ते मानवी जीवनासाठीही सुरक्षित नसल्यामुळे पुनर्वसन केंद्रात बिबट्याचे पुढील संगोपन केले जाणार आहे. मात्र, या बिबट्याचा बोरीवली किंवा जुन्नरचा प्रवासाला पश्चिम वनविभागाकडून ‘हिरवा कंदील’ कधी मिळेल? याकडे आता वन्यजीवप्रेमींचे लक्ष लागले आहे.
बोरीवली अन‌् माणिकडोह ‘हाउसफुल्ल’
बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील, तसेच जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट रेस्क्यू सेंटर सध्या हाउसफुल्ल झाले आहेत. बोरीवलीची एकूण क्षमता २४ बिबट्यांची असली, तरीही त्यांना संगोपनाकरिता काही पिंजरे रिकामे ठेवावे लागतात. त्यामुळे १८ बिबटे ठेवण्यापर्यंत तेथे बिबट्यांना स्वीकारले जाते. सध्या येथे १५ बिबटे असून, यामध्ये नाशिकचे तीन आहे. या ठिकाणी वैद्यकीय सोईसुविधाही तोकड्या आहेत. त्या तुलनेत माणिकडोह केंद्र मोठे असून, येथे ३६ बिबटे एकाच वेळी ठेवता येऊ शकतात आणि या केंद्रासाठी स्वतंत्र यंत्रणा व मनुष्यबळ कार्यरत आहे. मात्र, येथे सध्या ३४ बिबटे आहेत.

Web Title: The leopard lost its cone by hitting the cage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.