विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 06:56 PM2019-04-16T18:56:52+5:302019-04-16T18:57:32+5:30
कळवण : पाण्याच्या शोधात तालुक्यातील मौजे वडाळा गावाच्या शिवारातील विहिरीत रविवारी (दि.१४) रात्रीच्या सुमारास पडलेल्या बिबट्याला जेरबंद करून बाहेर काढण्यात कनाशी वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना यश आले आहे. सोमवारी (दि.१५) रात्री बिबट्याला पुन्हा जंगलात सोडून देण्यात आले.
कळवण : पाण्याच्या शोधात तालुक्यातील मौजे वडाळा गावाच्या शिवारातील विहिरीत रविवारी (दि.१४) रात्रीच्या सुमारास पडलेल्या बिबट्याला जेरबंद करून बाहेर काढण्यात कनाशी वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना यश आले आहे. सोमवारी (दि.१५) रात्री बिबट्याला पुन्हा जंगलात सोडून देण्यात आले.
कळवण तालुक्याच्या पश्चिम भागातील वडाळा व कोसुर्डे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी वडाळागावच्या शिवारातील चिंतामण लक्ष्मण गांगुर्डे यांच्या विहिरीत रविवारी रात्री बिबट्या पडला होता. विहिरीत पाणी जास्त असल्याने विहिरीच्या आतील कठड्यावर बिबट्या बसला होता. विहिरीचे कठडे ढासळलेले असल्याने शिकार करण्याच्या प्रयत्नात बिबट्या विहिरीत पडला असावा असा ग्रामस्थांचा अंदाज आहे.
सकाळी बिबट्याच्या ओरडण्याचा आवाज स्थानिक नागरिकांनी ऐकला असता त्यांनी विहिरीकडे धाव घेतली. त्यांना विहिरीत बिबट्या पडलेला आढळला. त्यांनी तात्काळ कनाशी वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून माहिती दिली.
सदर घटनेची माहिती मिळताच कनाशी वनक्षेत्रपाल अधिकारी सी. आर. कामडे यांनी कर्मचाºयांसह घटनास्थळ गाठले. विहिरीत पाणी जास्त असल्याने बिबट्याला बाहेर काढण्यात अडथळा निर्माण झाला. तसेच या भागात विजेचे भारनियमन असल्याने त्यात अधिक भर पडली.
ग्रामस्थांनी डिझेल मशीनची व्यवस्था करून विहिरीतले पाणी कमी करण्यास मदत केली. त्यानंतर विहिरीत पिंजरा सोडण्यात आला. पिंजरा विहिरीत सोडताच बिबट्या पिंजºयात अडकला. त्यानंतर त्यास बाहेर काढण्यात आले. व सोमवारी रात्रीचदूर जंगलात सोडून देण्यात असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाºयांनी दिली.
(फोटो १६ कनाशी बिबट्या)
वडाळा येथील विहिरीत पडलेला बिबट्या.