‘त्या’ माणसांवर हल्ले करणारा बिबट्या नर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 11:36 PM2020-07-25T23:36:17+5:302020-07-25T23:50:15+5:30
नाशिक : दारणा खोऱ्यातील दोनवाडे, हिंगणवेढे, बाबळेश्वर या गावांमध्ये तीन महिन्यांपूर्वी झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात तीन मुलांसह एका वृद्धाचा बळी गेला. हे हल्ले एका नर बिबट्याकडूनच झाले असल्याचे हैदराबाद येथील केंद्र सेल्युलर आणि आण्विक जीवविज्ञान (सीसीएमबी) प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या लाळेच्या प्राथमिक नमुना चाचणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अद्यावपावेतो जेरबंद करण्यात आलेल्या तिघा मादी बिबट्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्ततेचा मार्ग खुला झाला आहे.

एप्रिलपासून दारणा काठालगतच्या गावांमध्ये बिबट्याचे आठ हल्ले झाले आहेत. चार हल्ल्यात जीवितहानी झाली. त्यामुळे बिबट्या नरभक्षक झाला की काय? अशी शंका होती. थेट वनमंत्र्यांकडूनदेखील यासंदर्भात दखल घेतली जाऊन राज्याचे मुख्य प्रधान वनसंरक्षक यांच्याकडे याबाबत त्यांनी उपाययोजना करण्याचे आदेशही दिले होते.