खडांगळी शिवारात बिबट्या जेरबंद
By admin | Published: March 11, 2017 12:45 AM2017-03-11T00:45:51+5:302017-03-11T00:46:01+5:30
सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागातील खडांगळी शिवारात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले.
सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागातील खडांगळी शिवारात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले.
गेल्या आठवड्याभरापासून वडांगळी शिवारात बिबट्याचा मुक्तपणे वावर होता. त्यामुळे वनविभागाने वडांगळी शिवारात पिंजरा लावला होता. मात्र बिबट्या पिंजऱ्यात येत नव्हता.
गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास खडांगळी शिवारात निवृत्ती गणपत कोकाटे हे शेतातील मका पिकाला पाणी भरत असतांना त्यांना बिबट्या दिसला. कोकाटे यांनी परिसरातील शेतकऱ्यांना घटनेची माहिती दिली. नाशिक पश्चिम भागाचे उपवनसंरक्षक टी. ब्यूअला, सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने वडांगळी शिवारातील पिंजरा खडांगळी येथील कोकाटे यांच्या मक्याच्या शेताजवळ लावला. गेल्या आठवड्यापासून बिबट्याचा शिवारात वावर होता. त्याने पाळीव कुत्रे फस्त केल्याच्या घटना घडल्या होत्या.