नळवाडी शिवारात बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:54 AM2017-09-23T00:54:26+5:302017-09-23T00:54:32+5:30
तालुक्यातील नळवाडी शिवारात साडेतीन वर्षाच्या बिबट्याला पकडण्यात वन-विभागाला यश आले आहे. तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने दहशत निर्माण केली होती. शेतकºयांच्या पाळीव जनावरांवर हल्ले करण्यासह या परिसरातील वासरू व शेळी बिबट्याने फस्त केली होती. त्यामुळे या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी शेतकºयांनी केली होती.
सिन्नर/नांदूरशिंगोटे : तालुक्यातील नळवाडी शिवारात साडेतीन वर्षाच्या बिबट्याला पकडण्यात वन-विभागाला यश आले आहे. तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने दहशत निर्माण केली होती. शेतकºयांच्या पाळीव जनावरांवर हल्ले करण्यासह या परिसरातील वासरू व शेळी बिबट्याने फस्त केली होती. त्यामुळे या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी शेतकºयांनी केली होती. नळवाडी शिवारातील गंगाधर कचरू दराडे यांच्या शेताजवळ गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य होते. त्यामुळे वनविभागाने सोमवारी (दि. १८) रोजी दराडे यांच्या शेतात पिंजरा लावला होता. गुरुवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास बिबट्या पिंजºयात अडकला. स्थानिक शेतकºयांना डरकाळ्यांचा आवाज आल्याने बिबट्या पिंजºयात अडकल्याची खात्री झाली. त्यांनी तातडीने सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके यांना घटनेची माहिती दिली. बोडके यांच्यासह नांदूरशिंगोटे वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी पी. ए. सरोदे, वनरक्षक आर एच. पठाण, के.आर. इतकर, बी. एन. विघे, एम. एच. खैरनार, वनमजूर वसंत आव्हाड, तुकाराम मेंगाळ, भगवान जाधव, जगन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे सरोदे यांनी सांगितले.