लोकसाक्षरतेसाठी गावागावांत घडणार ‘बिबट्यादूत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 09:00 PM2020-07-11T21:00:02+5:302020-07-12T02:01:30+5:30

नाशिक : भय इथले संपत नाही... अशीच काही अवस्था नाशिक तालुक्यातील दारणाकाठाची आहे. कारण येथील गावांनी तीन चिमुकले व एका आजोबाला बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावले आहे. या भागात बिबट्याची दहशत कमी व्हावी व हल्ले थांबावे यासाठी वनविभागाने लोकसाक्षरतेच्या दृष्टीने पाऊल उचलत पुन्हा ‘जाणता वाघोबा’ हे जनप्रबोधनपर अभियान राबविण्याची तयारी केली आहे. याद्वारे गावागावांत बिबट्यादूत घडविले जाणार आहे.

'Leopard messenger' to be held in villages for public literacy | लोकसाक्षरतेसाठी गावागावांत घडणार ‘बिबट्यादूत’

लोकसाक्षरतेसाठी गावागावांत घडणार ‘बिबट्यादूत’

Next

नाशिक : (अझहर शेख )भय इथले संपत नाही... अशीच काही अवस्था नाशिक तालुक्यातील दारणाकाठाची आहे. कारण येथील गावांनी तीन चिमुकले व एका आजोबाला बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावले आहे. या भागात बिबट्याची दहशत कमी व्हावी व हल्ले थांबावे यासाठी वनविभागाने लोकसाक्षरतेच्या दृष्टीने पाऊल उचलत पुन्हा ‘जाणता वाघोबा’ हे जनप्रबोधनपर अभियान राबविण्याची तयारी केली आहे. याद्वारे गावागावांत बिबट्यादूत घडविले जाणार आहे.
दारणा नदीकाठालगतच्या गावागावांत ऊसशेतीचे क्षेत्र अधिक असून, बिबट्याची दहशत वाढत आहे. येथील बिबट्यांची दहशत कमी व्हावी, यासाठी वनविभागाचे पथक प्रयत्नशील असून, जाखोरीत बिबट्याच्या मादीला जेरबंद करण्यास यशही मिळाले. दरम्यान, यासोबत नागरिकांनाही बिबट्याचे जीवशास्र माहीत होणे तितकेच गरजेचे आहे, कारण त्याशिवाय बिबट्याच्या हल्ल्यात होणारी मनुष्यहानी रोखता येणे अशक्य होईल.
नागरिक सतर्क, सजग झाले तर योग्य ती खबरदारी नक्कीच घेतील आणि बिबट्याचे भय कमी होण्यास मदतही होईल, म्हणूनच हे जनजागृतीपर अभियान वनविभागाने राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
-----------------
..असा आहे ‘जाणता वाघोबा’
अभियानाद्वारे शास्रोक्त माहिती व बिबट्याचे जीवशास्र वन्यजीव अभ्यासकांद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचविले जाते. बिबट्याच्या सवयी, खाद्य, हल्ल्यांची पद्धत, सक्रि य होण्याची वेळ आदींबाबत जागरूक केले जाते. तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये बिबट्याविषयी जागृतीपर कार्यक्र म राबविणे, माहितीपत्रके वाटणे, भित्तिपत्रके लावणे आदीप्रकारे बिबट्याचे भय कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.
-------------
दोन वर्षांपूर्वी निफाडमध्ये अभियान यशस्वी
दोन वर्षांपूर्वी निफाडच्या गोदाकाठावर राबविलेले हे अभियान पूर्णपणे यशस्वी झाले. गोदाकाठावरील सायखेडा ते म्हाळसाकोरेपर्यंतच्या विविध गावांनी यामध्ये सहभाग नोंदविला. तेथील सरपंच पोलीसपाटील, शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्या सहभागातून गावागावांत बिबट्याचे जीवशास्र सांगणारे बिबट्यादूत घडविले गेले. निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बागायती व उसाची शेती आहे. प्रामुख्याने उसाच्या शेतीत बिबटे दडून राहण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यापूर्वी अनेकदा ऊसतोड कामगारांवर बिबट्यांचे हल्ले झालेले आहेत. या भागात आजही उसात बिबटे आहत; मात्र लोक त्यानुसार खबरदारी घेऊ लागल्याने माणसांवरील हल्ले थांबण्यास मदत झाली.
-----------------
बिबट्या पूर्वीपासून लोकवस्तीजवळ राहत आलेला आहे. बिबटे जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरूच राहणार, मात्र यामुळे बिबट्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार नाही. यासाठी निफाड, जुन्नर या शहरांत ज्याप्रमाणे लोकांना बिबट्याविषयी शास्रीय माहिती देत सजग केले गेले, तसेच दारणाकाठाच्या पंचक्रोशीतही जाणता वाघोबाद्वारे करण्याचा मानस आहे. वनविभागाच्या या प्रयत्नांना निश्चितच यश येईल. अर्थात त्यासाठी लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यात साथ मिळेल.
- सुनील लिमये,
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक,
पश्चिम महाराष्ट्र

Web Title: 'Leopard messenger' to be held in villages for public literacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक