...अखेर सुळके गमावलेला बिबट्या पुनर्वसन केंद्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:14 AM2021-01-17T04:14:03+5:302021-01-17T04:14:03+5:30
--- नाशिक : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर व अन्य ठिकाणी मानवी हल्ले करत दोघा मुलींना ठार मारणारा बिबट्या ‘नर’ ...
---
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर व अन्य ठिकाणी मानवी हल्ले करत दोघा मुलींना ठार मारणारा बिबट्या ‘नर’ असल्याचे त्याच्या लाळेच्या नमुने तपासणी अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. याबाबत पश्चिम वनविभागाला हैदराबादच्या सीसीएमबी प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे सुळके गमावलेल्या ‘त्या’ नर बिबट्याला पुढील आयुष्य कैदेत काढावे लागणार यावर शिक्कामोर्तब झाले. त्यास जुन्नर येथील बिबट पुनर्वसन केंद्रात पोहचविण्यात आले आहे.
नाशिक पश्चिम वनविभागाच्या इगतपुरी वनपरिक्षेत्रातील काही गावांमध्ये गेल्या नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांत बिबट-मानव संघर्ष उफाळून आला होता. बिबट्याने दोन ठिकाणी हल्ले करत दोघा मुलींना ठार केले होते. त्यानंतर तातडीने या भागात पिंजरे तैनात करण्यात आले आणि वनविभागाने दोन बिबट्यांना जेरबंद केले. त्यापैकी एक नर आणि दुसरी मादीचा समावेश होता. १ डिसेंबररोजी पिंजऱ्यात अडकलेल्या प्रौढ बिबट्या हा अत्यंत आक्रमक आहे. या बिबट्याने पिंजऱ्यावर धडका देत स्वत:ला जखमी करून घेतले आणि जबड्यातील सुळकेही गमावले होते. लहान पिंजऱ्यात बिबट्या अडकून महिनभर राहिल्याने तो अधिक तणावाखाली आला होता. या बिबट्याला पुनर्वसन केंद्रात हलविण्याबाबत ‘लोकमत’ने लक्ष वेधले. यानंतर पश्चिम वनविभागाने हालचालीही सुरू केल्या; मात्र बोरिवली आणि जुन्नरमधील माणिकडोह येथील बिबट पुनर्वसन केंद्रात जागाच शिल्लक नसल्याने या बिबट्याला लहान पिंजऱ्यात तब्बल ४० ते ४२ दिवस काढावे लागले. अखेर माणिकडोहच्या केंद्रात जागा निर्माण झाल्याने त्यास शुक्रवारी (दि.१६) हलविण्यात आल्याची माहिती वन्यजीव विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
--इन्फो--
नाशिकच्या चार बिबट्यांना ‘जन्मठेप’
लॉकडाऊन काळात दारणाकाठालगत बिबट्यांकडून झालेल्या मानवी हल्ल्यांची पुनरावृत्ती इगतपुरीच्याही बाबतीत झाली. दारणाकाठावरील तीन आणि इगतपुरीचा हा एक बिबट्या असे एकूण चार प्रौढ नर बिबटे कायमस्वरूपी तुरुंगवासात राहणार आहे. सीसीएमबी प्रयोगशाळेने नमुने तपासणी करून दिलेल्या अहवालानुसार वनविभागाने हा निर्णय घेतला आहे. या बिबट्यांकडून मानवी जीवितास धोका निर्माण होणार असल्याने त्यांना आता नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाणार नाही, अशी माहिती सूत्रांनी
----
फॉलोअप स्टोरी लोगो वापरावा.
फोटो आर वर १६बिबट्या नावाने सेव्ह आहे.