नाशिकच्या मेरी भागात भिंतीवर बिबट्याची विश्रांती : नागरिक भयभीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 08:44 PM2017-09-09T20:44:55+5:302017-09-09T20:49:02+5:30
काही धाडसी नागरिकांनी दूरवरून बिबट्याची ‘बैठक’ मोबाईलच्या कॅमेºयात टिपली. काही वेळेतच सदर छायाचित्रे सोशल मिडियावरून व्हायरल झाली.
नाशिक : येथील मेरी परिसरात शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शासकिय कार्यालयांच्या संरक्षक भिंतीवर चक्क बिबट्याने विश्रांती घेतल्याचे परिसरातील नागरिकांना दिसून आले. काही धाडसी नागरिकांनी दूरवरून बिबट्याची ‘बैठक’ मोबाईलच्या कॅमेºयात टिपली. काही वेळेतच सदर छायाचित्रे सोशल मिडियावरून व्हायरल झाली.
त्यानंतर वनविभाग खडबडून जागे झाले. तत्काळ वनरक्षक, वनपालांच्या ‘रेस्क्यू’ पथकाने मेरी परिसरातील हायड्रो भागात धाव घेतली. सर्च लाईटसह परिसरात गस्त वाढवून बिबट्याचा शोध घेण्यास सुरूवात करण्यात आली. बिबट्या एका परिसरात जास्त वेळ थांबून राहत नाही, तो सातत्याने रात्रीच्या सुमारास जागा बदलत भक्ष्याच्या शोधात असतो, त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही; मात्र रात्र वैºयाची समजून खबरदारी घेत अंधारात एकटे बाहेर पडू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे. या भागात तातडीने पिंजरे लावून, बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.